जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 CSK vs KKR : आयपीएलचा थरार आजपासून सुरू, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming?

IPL 2022 CSK vs KKR : आयपीएलचा थरार आजपासून सुरू, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming?

IPL 2022 CSK vs KKR : आयपीएलचा थरार आजपासून सुरू, कधी आणि कुठे पाहाल Live Streaming?

गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट विश्वाला वेध लागलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) आजपासून (शनिवार) सुरू होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मार्च : गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट विश्वाला वेध लागलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) आजपासून (शनिवार) सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) या गेल्या सिझनमधील फायनलमध्ये गेलेल्या दोन टीममध्ये यंदा पहिली मॅच होणार आहे. केकेआरची टीम श्रेयस अय्यरच्या  (Shreyas Iyer) कॅप्टनसीमध्ये मैदानात उतरणार आहे. तर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) रूपानं चेन्नईलाही नवा कॅप्टन मिळाला आहे. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) दोन दिवसांपूर्वीच जडेजाकडे कॅप्टनसी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिली मॅच होणार आहे. हे पिच बॅटींगसाठी अनुकूल आहे. या पिचवरील सरासरी स्कोअर 180 आहे. लहान बाऊंड्री आणि फास्ट आऊटफिल्डचा मोठा फायदा बॅटर्सना मिळतो. त्यामुळे चांगल्या सुरूवातीनंतर या पिचवर 200 रन करणे सोपे आहे. IPL 2022 : आयपीएल सुरू होण्यापूर्वी राजस्थानमध्ये भूकंप, सॅमसनच्या तक्रारीनंतर मॅनेजमेंटची मोठी कारवाई प्रश्न : सीएसके विरूद्ध केकेआर (CSK vs KKR) हा आयपीएल 2022 मधील पहिला सामना कुठे होणार आहे? उत्तर : सीएसके आणि केकेआरमध्ये होणारा आयपीएल 2022 मधील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. प्रश्न : सीएसके विरूद्ध केकेआर यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल? उत्तर : सीएसके विरूद्ध केकेआर यांच्यातील सामना शनिवार (26 मार्च) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. संध्याकाळी 7.00 वाजता टॉस होईल. प्रश्न : सीएसके विरूद्ध केकेआर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल? उत्तर : सीएसके विरूद्ध केकेआर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येईल प्रश्न : सीएसके विरूद्ध केकेआर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल? उत्तर : सीएसके विरूद्ध केकेआर यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग ‘डिस्ने प्लस-हॉटस्टार’वर पाहाता येईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , ipl 2022 , KKR
  • First Published :
जाहिरात
जाहिरात