मुंबई, 8 ऑगस्ट: आयपीएल स्पर्धेनंतर लगेच टी20 वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. आयपीएलमधील काही जणांच्या खराब कमगिरीमुळे टी20 वर्ल्ड कपसाठी योग्य टीम निवडली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी निडण्यात आलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. तर शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांनी जोरदार कामगिरी करत निवड समितीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला आहे. (AFP)
शार्दुल ठाकूरच्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे. इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या शार्दुलनं यूएई लेगमधील 7 मॅचमध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. तो चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. हार्दिक पांड्या सध्या बॉलिंग करत नाही. शार्दुल त्याचा चांगला पर्याय ठरला असता. शार्दुलची बॅटींग देखील उपयुक्त आहे. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉननंही शार्दुलचा समावेश करण्याची मागणी केली आहे. (AFP)