नवी दिल्ली, 12 एप्रिल : टीम इंडियाचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने सनराझर्स हैदराबादच्या (SRH) पराभवाला मनिष पांडेला (Manish Pandey) जबाबदार धरलं आहे. मनिषनं शेवटच्या काही ओव्हर्समध्ये आक्रमक बॅटींग केली असती तर हैदराबादची टीम विजयी झाली असती, असं मत सेहवागनं व्यक्त केलं आहे. 'क्रिकबझ' शी बोलताना सेहवागनं हे मत व्यक्त केलं आहे.
सेहवागने एका ट्विटर युझर्सच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, "मनिष पांडेनं शेवटच्या 6 ओव्हर्समध्ये फक्त 1 सिक्स लगावला. शेवटच्या दोन-तीन ओव्हरमध्ये एकही फोर मारला नाही. त्यानं सिक्स देखील अगदी शेवटच्या बॉलवर लगावला. तो पर्यंत मॅच हैदराबादच्या हातून निसटली होती.
ती मॅचमधील महत्त्वाची वेळ होती. त्यावेळी मनिषनं पुढं यायला हवं होतं. कारण, त्यानं पूर्ण दबाव झेलला होता. त्यावेळी मनिषनं मोकळेपणे फटकेबाजी करायला हवी होती. त्यानं तसं केलं असतं तर जी टीम 10 रननं मॅच हरली ती एक-दोन बॉल आधीच मॅच जिंकली असती."
मनिषचं असं का झाल? याचं कारणही सेहवागनं सांगितलं आहे. "अनेकदा बॅट्समन सेट झाल्यानंतरही त्याला मोठे शॉट्स खेळता येतील असे बॉल मिळत नाही. मनिष बरोबरही असंच झालं. कोलकाताच्या बॉलर्सनी त्याला स्लोअर आणि यॉर्कर बॉल टाकले. त्यामुळे त्याला मोठे फटके मारता आले नाहीत.'' असं सेहवागनं स्पष्ट केलं.
'....म्हणून केन विल्यमसनला खेळवलं नाही', SRH च्या कोचनं सांगितलं कारण
कोलकातानं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 187 रन काढले. त्याला उत्तर देताना हैदराबादची टीम 5 आऊट 177 पर्यंतच मजल मारु शकली. टीम इंडियाकडून खेळलेल्या मनिषला रनरेट वाढवण्यात अपयश आल्यानं तो ट्रोल झाला आहे. हैदराबादची सुरुवात 2 आऊट 10 अशी खराब झाली होती. नंबर 3 वर बॅटिंगला आलेला मनिष शेवटपर्यंत मैदानात होता. इतकंच नाही तर त्यानं आंद्रे रसेलच्या शेवटच्या बॉलवर सिक्स देखील लगावला. पण, त्याचा हैदराबादला विजयात उपयोग झाला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, SRH, Virender sehwag