चेन्नई, 12 एप्रिल: आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021) सनरायझर्स हैदराबादची (SRH) सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 10 रननं हरवलं. या मॅचमध्ये हैदराबादची टीम न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याच्या शिवाय मैदानात उतरली होता. सध्या फॉर्मात असलेल्या विल्यमसनला पहिल्या मॅचमध्ये संधी न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
हैदराबादचे कोच ट्रेव्हर बेलिस (Trevor Bayliss) यांनी विल्यमसनला न खेळवण्याचं कारण सांगितलं आहे. "विल्यनमसनला मॅच फिटनेससाठी थोडा वेळ द्यायला हवा. त्याला सध्या नेट्समध्ये आणखी वेळ घालवण्याची गरज आहे," असे बेलिस यांनी सांगितले. विल्यमसन टीममध्ये जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) जागी खेळला असता. पण बेअरस्टो सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे आमच्यासाठी तो काळजीचा विषय नाही, असं त्यांनी सांगितलं. रविवारी झालेल्या मॅचमध्ये बेअरस्टोनं 40 बॉलमध्ये 55 रनची खेळी केली होती.
हैदराबादला मॅच जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 57 रनची आवश्यकता असताना बिग हिटर अब्दुल समदच्या आधी विजय शंकरला बॅटींगला पाठवण्यात आलं होतं. बेलिस यांनी त्याचंही कारण सांगितलं आहे. "गेल्या काही दिवसात झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये विजय आमचा सर्वोत्तम खेळाडू होता. त्यानं एका मॅचमध्ये 95 रन देखील काढले होते. या प्रकारची परिस्थिती नेहमीच अवघड असते. यामध्ये तुम्हाला पहिल्या बॉलपासून फटकेबाजी करावी लागते," असंही बेलिस यांनी स्पष्ट केले.
मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टोच्या अर्धशतकानंतरही सनरायजर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 10 रनने पराभव झाला आहे. कोलकात्याने दिलेलं 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 177-5 पर्यंतच मजल मारता आली.
'बाबर आझमचा खेळ पाहून शिक', विराट कोहलीला मिळाला अजब सल्ला
हैदराबादकडून मनिष पांडेने 44 बॉलमध्ये नाबाद 61 रन केले, तर जॉनी बेयरस्टोने 40 बॉलमध्ये 55 रन केले. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेतल्या, तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स, आंद्रे रसेल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.