मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोठी बातमी: 2 वर्षांपूर्वीच विराटनं केला होता कॅप्टनसी सोडण्याचा विचार, टीम मॅनेजमेंटबद्दल म्हणाला...

मोठी बातमी: 2 वर्षांपूर्वीच विराटनं केला होता कॅप्टनसी सोडण्याचा विचार, टीम मॅनेजमेंटबद्दल म्हणाला...

विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यानं या आयपीएल सिझननंतर (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 ऑक्टोबर: विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2021) भारतीय टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यानं या आयपीएल सिझननंतर (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) कॅप्टनसी सोडण्याची घोषणा केली. विराटनं घेतलेल्या या दोन निर्णयाची क्रिकेट विश्वात बरीच चर्चा झाली. विराट आरसीबीची कॅप्टनसी सोडण्याचा विचार दोन वर्षांपासून करत होता. 'स्टार स्पोर्ट्स' शी बोलताना त्यानं हा गौप्यस्फोट केला आहे. विराटनं यावेळी सांगितलं की, 'आरसीबीची कॅप्टनसी सोडण्याबात मी टीममधला सहकारी आणि चांगला मित्र एबी डिविलियर्ससोबत (AB de Villiers) दोन वर्षांपूर्वीच चर्चा केली होती. मला एक शांततापूर्ण वातावरण हवं होतं. त्यामुळे मी आरसीबीची कॅप्टनसी सोडण्याचा विचार करत होतो. आमची या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर आणखी एक वर्ष देण्याचा निर्णय मी घेतला. त्यानंतर मॅनेजमेंट बदलले आणि 2020 पासून काही गोष्टी चांगल्या झाल्या,' असे त्याने सांगितले. DC vs RCB: भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटचा जोरदार जल्लोष! पाहा VIDEO रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मागील वर्षा झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला होता. यंदाही आरसीबीनं चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकासाह 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आरसीबीची पुढील लढत कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे. या सिझनमध्ये आरसीबीनं काही चांगले विजय मिळवले असून विराटच्या टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. IPL 2021: मुंबईच्या विजयानं विराटला दिलासा, इतर टीमची मात्र उडाली झोप! 'एबी डिविलियर्सनं काही दिवसांपूर्वी विराटच्या कॅप्टनसीची प्रशंसा केली होती. त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणं हे माझं भाग्य असून मी त्याच्या कॅप्टनसीचा फॅन आहे, ' असं डिविलियर्सनं सांगितलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या