जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: RCB च्या नव्या बॅट्समननं 49 बॉलमध्ये काढले 104 run, विराटही झाला प्रभावित

IPL 2021: RCB च्या नव्या बॅट्समननं 49 बॉलमध्ये काढले 104 run, विराटही झाला प्रभावित

IPL 2021: RCB च्या नव्या बॅट्समननं 49 बॉलमध्ये काढले 104 run, विराटही झाला प्रभावित

आरसीबीच्या खेळाडूंची नुकतीच एक प्रॅक्टीस मॅच झाली. या मॅचमध्ये मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याने जबरदस्त खेळ केला. त्याने फक्त 49 बॉलमध्ये 104 रन काढले.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 7 एप्रिल: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी (RCB) मिडल ऑर्डर हा एक काळजीचा विषय आहे. मागच्या आयपीएलमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) यांचा अपवाद वगळता अन्य बॅट्समननी निराशा केली होती. यावेळी तर विराट कोहली ओपनिंगला खेळणार आहे. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये चांगले बॅट्समन असणं ही आवश्यक गोष्ट बनली आहे. या आयपीएलपूर्वी सर्वच टीम आपल्या तयारीला सध्या फायनल टच देत आहे. आरसीबीच्या खेळाडूंची नुकतीच एक प्रॅक्टीस मॅच झाली. या मॅचमध्ये मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार (Rajat Patidar) याने जबरदस्त खेळ केला. त्याने फक्त 49 बॉलमध्ये 104 रन काढले. त्याच्या या फटेबाजीमुळे विराटसह टीममधील सर्वजण प्रभावित झाले आहेत. विशेष म्हणजे रजत  मिडल ऑर्डरचा खेळाडू असल्यानं त्याचा फॉर्म हा आरसीबीसाठी आनंदाची बातमी आहे. रजतनं या मॅचमध्ये 49 बॉलमध्ये 104 रन काढले. या आक्रमक फटकेबाजीमुळे रजतच्या टीमनं 225 रनचं टार्गेट चार बॉल राखून पार केलं. रजतनं पहिल्या मॅचमध्ये 35 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली होती. यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही रजतनं चांगली कामगिरी केली होती. रजत पाटीदारनं मुश्ताक अली स्पर्धेत 51 बॉलमध्ये 96 रनची आक्रमक इनिंग खेळली होती. मिडल ओव्हर्समध्ये चांगल्या स्ट्राईक रेटनं रन काढण्याची रजतमध्ये क्षमता आहे. त्यामुळे ‘मिडल ऑर्डर’ या आरसीबीच्या डोकेदुखीवर यावर्षी उत्तर मिळण्याची शक्यता आहे. ( वाचा:  टीकेनंतरही पृथ्वी शॉ नं केलं बॉसचं स्वागत, पॉन्टिंगची केली ‘चक दे’ मधील शाहरुखशी तुलना ) मॅक्सवेल देखील चमकला रजत पाटीलला ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने चांगली साथ दिली. मॅक्सवेलनं 31 बॉलमध्ये 44 रन काढले. या दोघांच्या पार्टरनरशिपमुळेच त्यांच्या टीमनं मॅच जिंकली. ग्लेन मॅक्सवेलला आरसीबीनं यंदा मोठ्या किंमतीमध्ये खरेदी केलं आहे. त्याच्याकडून आरसीबीला मोठ्या अपेक्षा आहेत. आरसीबीची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नईत होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात