जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021: आऊट झाल्यानंतर विराटची आदळाआपट, कॅप्टनचा राग पाहून यंग ब्रिगेड स्तब्ध; पाहा VIDEO

IPL 2021: आऊट झाल्यानंतर विराटची आदळाआपट, कॅप्टनचा राग पाहून यंग ब्रिगेड स्तब्ध; पाहा VIDEO

IPL 2021: आऊट झाल्यानंतर विराटची आदळाआपट, कॅप्टनचा राग पाहून यंग ब्रिगेड स्तब्ध; पाहा VIDEO

सनरायजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णाधार विराट कोहली (Virat Kohli) 33 धावांची खेळी केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल: विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Bangalore) सनराइजर्स हैदराबादला (Sun Risers Hyderabad) धूळ चारत आयपीएल 2021 (IPL 2021) मधील दुसरा विजय मिळवला. आरसीबीने एसआरएचला दिलेलं 150 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना SRH ने 143 रन्स केल्या आणि 6 धावांनी हा सामना त्यांना गमवावा लागला. दरम्यान सलग दुसऱ्या विजयानंतर विराटच्या टीमचा उत्साह वाढला आहे. मात्र बुधवारच्या सामन्यात आरसीबीच्या यंग ब्रिगेडने कॅप्टन कोहलीच्या राग पाहिला आणि ते यावेळी केवळ स्तब्ध झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video on Social Media) व्हायरल होत आहे. सनरायजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB vs SRH) कर्णाधार विराट कोहली 33 धावांची खेळी केली. जेसन होल्‍डरने विराट कोहलीला आऊट केले, विजय शंकरने कोहलीचा कॅच घेतला. 33 धावा करून पॅव्हेलियमध्ये परतलेल्या कोहलीला त्याचा राग अनावर झाला, आणि त्याने रागाने त्याची बॅट खूर्चीवर आपटली. कोहलीचा हा राग पाहून संपूर्ण यंग ब्रिगेड एकटक त्याच्याकडे पाहत स्तब्ध झाली होती.

जाहिरात

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कोहलीला रागावर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी कोहलीने सांभाळून खेळले पाहिजे होते अशी देखील प्रतिक्रिया दिली आहे. (हे वाचा- 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, थरारक लढतीमध्ये विराट कोहलीच्या टीमचा विजय ) दरम्यान जरी कोहली स्वत:च्या फलंदाजीमुळे खूश नव्हता, तरी त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यात धडाकेबाज गोलंदाज शाहबाज नदीमने जरा देखील उशीर केला नाही. आरसीबीच्या विजयाचा खरा हिरो नदीमच होता. दोन ओव्हर्समध्ये नदीमने बुधवारचा सामना आरसीबीच्या बाजुने वळवला होता. त्याने दोन ओव्हरमध्ये सात रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021
  • First Published :
जाहिरात
जाहिरात