Home /News /sport /

IPL 2021: 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, थरारक लढतीमध्ये विराट कोहलीच्या टीमचा विजय

IPL 2021: 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, थरारक लढतीमध्ये विराट कोहलीच्या टीमचा विजय

शाहबाज अहमदच्या (Shahbaz Ahmed) एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दिशेनं असलेली मॅच विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) दिशेनं झुकवली. त्यामुळे बंगळुरुनं थरारक लढतीत हैदराबादचा 6 रननं पराभव केला.

    चेन्नई, 14 एप्रिल : शाहबाज अहमदच्या (Shahbaz Ahmed) एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दिशेनं असलेली मॅच  विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) दिशेनं झुकवली. पहिल्या मॅचचा हिरो असलेल्या हर्षल पटेलनं शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात चांगली बॉलिंग केली. त्यामुळे बंगळुरुनं थरारक लढतीत हैदराबादचा 6 रननं पराभव केला. आरसीबीचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादची 150 रनचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली नाही. वृद्धीमान साहा (Wriddhiman saha) फक्त 1 रन काढून आऊट झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मनिष पांडे (Manish Pandey) या जोडीनं हैदराबादची इनिंग सावरली. या अनुभवी जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 83 रनची पार्टरनरशिप केली.  डेव्हिड वॉर्नरनं यावेळी त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर लगेच तो 54 रनवर आऊट झाला. अहमदनं फिरवली मॅच वॉर्नर आऊट झाल्यानंतरही मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) या जोडीनं हैदाराबादचा पाठलाग पुढे सुरु ठेवला. हैदराबाद आरामात जिंकेल असं वाटत असतानाच 17 व्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. आरसीबीचा नवोदीत बॉलर शाहबाज अहमद त्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत मॅचमध्ये रंगत आणली. त्यानं एकाच ओव्हरमध्ये बेअरस्टो, पांडे आणि अब्दुल समद या तिघांना आऊट केलं. अहमदच्या ओव्हरनंतर आरसीबानं मॅचमध्ये पुनरागमन केलं. विजय शंकर आणि जेसन होल्डर या अनुभवी जोडीवर हैदराबादची मदार होती. या संकटाच्या प्रसंगात शंकर पुन्हा एकदा फेल झाला. तो हर्षल पटेलच्या बॉलिंगवर विराट कोहलीकडं कॅच देऊन आऊट झाला. विजय शंकर आऊट झाल्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये जेसन होल्डर आऊट झाला. राशिद खाननं फटकेबाजी करत मॅच जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. बंगळुरुकडून शाहबाज अहमदनं सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. यापूर्वी ग्लेन मॅक्सवेलचं (Glenn Maxwell) अर्धशतक हे आरसीबीच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं.  मॅक्सवेलनं  फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 59 रन काढले. या अर्धशतकासोबतच मॅक्सवेलनं आयपीएलमधील एक मोठा दुष्काळ संपवला आहे. त्यानं 40 मॅच आणि 5 वर्षांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहली आणि डीव्हिलियर्स आऊट झाल्यानंतर मॅक्सवेलवर मोठी जबाबदारी होती. त्यानं ती जबाबदारी पूर्ण करत शेवटपर्यंत खेळ केला. मॅक्सवेलच्या खेळामुळेच आरसीबीला 150 रनचं टार्गेट हैदराबाद विरुद्ध ठेवता आलं
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, SRH, Virat kohli

    पुढील बातम्या