चेन्नई, 12 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 14 व्या सिझनची (IPL 2021) सुरुवात विजयानं केली आहे. चेन्नईमध्ये रविवारी झालेल्या मॅचमध्ये त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 10 रननं पराभव केला. कोलकातानं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 187 रन काढले. त्याला उत्तर देताना हैदराबादची टीम 5 आऊट 177 पर्यंतच मजल मारु शकली. हैदराबादकडून मनिष पांडेनं (Manish Pandey) सर्वात जास्त 61 रन काढले. तरीही तो सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल झाला आहे.
टीम इंडियाकडून खेळलेल्या मनिषला रनरेट वाढवण्यात अपयश आल्यानं तो ट्रोल झाला आहे. हैदराबादची सुरुवात 2 आऊट 10 अशी खराब झाली होती. नंबर 3 वर बॅटिंगला आलेला मनिष शेवटपर्यंत मैदानात होता. इतकंच नाही तर त्यानं आंद्रे रसेलच्या शेवटच्या बॉलवर सिक्स देखील लगावला. पण, त्याचा हैदराबादला विजयात उपयोग झाला नाही.
हैदराबादच्या पराभवात मनिष पांडेचा रेकॉर्ड चांगला नाही. त्याने टीम पराभूत झालेल्या मॅचमध्ये आठ हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर टीम विजयी झालेल्या मॅचमध्ये मनिषनं फक्त 24 च्या सरासरीनं त्याच्या फक्त दोन हाफ सेंच्युरी आहेत. मनिषनं रविवारी झालेल्या मॅचमध्ये 44 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं नाबाद 61 रन काढले. या संथ खेळीसाठी सोशल मीडियावर मनिषला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.
Manish Pandey Never let his #KKR Team down. He Proved it many times back then. He reminded it again to all of us His knock today is one of the most selfish knock ever and absolutely No intent at all. #ManishPandey #SRHvsKKR
— SiD ♂️ (@WrittenbySID) April 11, 2021
#ManishPandey played from 2nd over & not hit single boundary in last 2 overs. Excellent
— NelloreReviews (@nellore_reviews) April 11, 2021
The best suggestion I can give for SRH management his just move on from Manish Pandey We had enough of him over last few years. In next year mega auction release him & pick Kane Williamson in the auction as we can't retain Williamson. #SRH #ManishPandey #KaneWilliamson
— Vemunurisaideep (@saideep1501) April 11, 2021
यापूर्वी नितीश राणा (Nitish Rana) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकात्याने हैदराबादला विजयासाठी 188 रनचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर बॅटिंगला आलेल्या नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी कोलकात्याला चांगली सुरुवात करून दिली.
( वाचा : On This Day : ब्रायन लारानं केला टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठा रेकॉर्ड! )
या दोघांमध्ये 7 ओव्हरमध्ये 53 रनची पार्टनरशीप झाली, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राहुल त्रिपाठीनेही नितीश राणाला चांगली साथ दिली. राणाने 56 बॉलमध्ये 80 रन केले, यात 9 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर राहुल त्रिपाठीने 29 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली, त्याने 5 फोर आणि 2 सिक्स मारले. हैदराबादकडून मोहम्मद नबी आणि राशिद खानला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि नटराजनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, Social media, SRH