लाहोर, 12 एप्रिल: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) या दोघांमध्ये अनेकदा तुलना केली जाते. क्रिकेटमधील सर्व प्रकारात विराटची आकडेवारी बाबर आझमपेक्षा सरस आहे. विराट कोहली हा सध्या जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समन असल्याचं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सांगितलं आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर अकीब जावेद (Aaqib Javed) यानं विराट कोहलीला एक अजब सल्ला दिला आहे. 'कोहलीनं बाबर आझमकडं पाहून क्रिकेटचं तंत्र शिकावं' असं जावेदनं म्हंटलं आहे.
क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना जावेद म्हणाला की, "विराट कोहलीकडं बाबर आझमच्या तुलनेत शॉट्सची मोठी रेंज आहे. पण एका बाबतीत तो कमकुवत आहे. बॉल स्विंग होत असेल तर जेम्स एंडरसनच्या विरुद्ध तो ऑफ स्टंपच्या बाहेर फसतो. तर बाबर आझमच्या खेळात सचिन तेंडुलकर प्रमाणे कोणतीही कमकुवत बाजू नाही."
जावेदनं यावेळी बाबरला फिटनेसवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. " भारतीय कॅप्टन क्रिकेट विश्वातील सर्वात फिट खेळाडू आहे. भारतानं 2017 साली यो-यो टेस्ट सुरु केली. त्यानंतर टीम इंडिया फिटनेसच्या बाबतीत अधिक सतर्क झाली आहे. पाकिस्तान बोर्डाचे फिटनेसबाबत स्वत:चे मापदंड आहेत," असं जावेद म्हणाला. "बाबरचं तंत्र अधिक भक्कम आहे. त्यानं कोहलीच्या फिटनेसचं अनुकरण केलं तर तो सर्वश्रेष्ठ खेळाडू बनू शकतो. या काळात कोहलीनं पाकिस्तान क्रिकेटचा कॅप्टन असलेल्या बाबर आझमकडून क्रिकेटचं तंत्र शिकावं.'' असा सल्लाही त्यानं दिला.
19 वर्षांच्या तरुण बॅट्समननं केली टेस्टमधील नंबर 1 बॉलरची धुलाई!
विराट सरस की बाबर?
बाबर आझमनं आजवर 31 टेस्टमध्ये 2167, 80 वन-डे मध्ये 3808, 49 टी 20 मध्ये 1744 रन काढले आहेत. विराट कोहलीनं 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आजवर वन-डे मध्ये 12169 रन टी 20 क्रिकेटमध्ये 3159 रन आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 7490 रन काढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Babar azam, Cricket news, Pakistan, Sports, Virat kohli