Home /News /sport /

IPL 2021: सचिनच्या मंत्रामुळे 'यशस्वी' झालो, भारताच्या नव्या स्टारनं दिलं मास्टर ब्लास्टरला श्रेय

IPL 2021: सचिनच्या मंत्रामुळे 'यशस्वी' झालो, भारताच्या नव्या स्टारनं दिलं मास्टर ब्लास्टरला श्रेय

राजस्थान रॉयल्सचा (RR) ओपनर यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध आक्रमक बॅटींग केली. त्यानं फक्त 19 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यशस्वीनं या खेळीचं श्रेय सचिनला (Sachin Tendulkar) दिलं आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : राजस्थान रॉयल्सचा (RR) ओपनर यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध आक्रमक बॅटींग केली. त्यानं फक्त 19 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. आयपीएल इतिहासात सर्वात वेगानं अर्धशतक झळकावणारा तो दुसरा अनकॅप खेळाडू बनला आहे. यशस्वीनं जोश हेडलवूज आणि सॅम करन या आंतरराष्ट्रीय बॉलर्सची जोरदार धुलाई केली. त्यानं या खेळीत 3 फोर आणि 6 सिक्स लगावले. यशस्वीनं 190 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यामुळे राजस्थाननं 15 बॉल राखत विजय मिळवला. अंडर 19 वर्ल्ड कपमधून उदयाला आलेल्या यशस्वी जयस्वालनं या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तो राजस्थानचा संजू सॅमसननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॅटर आहे. आयपीएलमधील यूएई लेग सुरू होण्यापूर्वी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबत झालेल्या एका ट्रेनिंग सेशनमुळे आपला खेळ बदलला असल्याचं यशस्वीनं सांगितलं. बॅटींगमध्ये झालेल्या  सुधारणेचं श्रेयही त्यानं मास्टर ब्लास्टरला दिलं आहे. मुंबईच्या टीमनं नुकताच ओमानचा दौरा केला. या दौऱ्यात मुंबईनं टी 20 आणि वन-डे मॅचची मालिका खेळली. या मालिकेपूर्वी मुंबईत सराव शिबिर झाले. यामध्ये सचिननं यशस्वीला टिप्स दिल्या. त्याचा यशस्वीला मोठा उपयोग झाला. यशस्वीनं ओमान विरुद्ध 4 मॅचमध्ये 212 रन काढले. तसंच मुंबईच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. IPL 2021: 11 वर्षांच्या अनुभवी बॉलरवर भारी पडला 19 वर्षांचा यशस्वी! नव्या विक्रमाची केली नोंद सचिनच्या टिप्समुळे सुधारणा यशस्वीनं या ट्रेनिंग सेशनबद्दलच्या अनुभवाबद्दल सांगितलं की, 'सचिननं मला माझं स्किल सुधारण्यात मदत केली. माझ्यात सुधारणा आवश्यक आहे, असं त्याला वाटलं. त्याच्यासारख्या दिग्गजाला माझ्या खेळात रस आहे, माझ्या खेळाची माहिती आहे हे पाहून खूप बरं वाटलं. बॅटींग करताना मी काय करु शकतो. मी कसा विचार केला पाहिजे. प्रत्येक बॉलरला कसं हातळलं पाहिजे, खेळाची गती कशी वाढवावी या सर्व विषयांवर सचिननं मला टिप्स दिल्या. सचिनकडून खेळाचा मंत्र मिळाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. IPL 2021: दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई 'प्ले ऑफ' गाठणार! कोचनी सांगितला फॉर्म्युला सॅमसनपेक्षा चांगला स्ट्राईक रेट यशस्वीनं आयपीएल स्पर्धेत 8 मॅचमध्ये 237 रन काढले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट राजस्थानचा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी बॅटर संजू सॅमसनपेक्षा चांगला आहे. संजूनं आत्तापर्यंत 139 च्या स्ट्राईक रेटनं 480 रन काढले आहेत. तर यशस्वीनं 151 च्या स्ट्राईक रेटनं खेळ केला आहे. त्यानं आत्तापर्यंत 1 अर्धशतक झळकावलं आहे. तसंच 29 फोर आणि 10 सिक्स लगावले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Sachin tendulakar

    पुढील बातम्या