Home /News /sport /

IPL 2021: दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई 'प्ले ऑफ' गाठणार! कोचनी सांगितला फॉर्म्युला

IPL 2021: दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई 'प्ले ऑफ' गाठणार! कोचनी सांगितला फॉर्म्युला

मुंबई इंडियन्सची पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तरीही, मुंबई इंडियन्स 'प्ले ऑफ' मध्ये (IPL 2021 Playoffs) प्रवेश करेल असा विश्वास टीमच्या कोचनी सांगितला आहे.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेत शनिवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध (MI vs DC) 4 विकेट्सनं पराभव झाला. या मॅचमध्ये मुंबईनं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 129 रन काढले होते. त्याला उत्तर देताना दिल्लीनं 5 बॉल राखत हा सामना जिंकला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तरीही, मुंबई इंडियन्स 'प्ले ऑफ' मध्ये (IPL 2021 Playoffs)  प्रवेश करेल असा विश्वास टीमचे बॉलिंग कोच शेन बॉन्ड (Shane Bond) याने व्यक्त केला आहे. त्यानं याचा फॉर्म्युला देखील सांगितला आहे. यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये मुंबईनं सर्वश्रेष्ठ कामगिरी केलेली नाही, हे बॉन्डनं यावेळी मान्य केलं. 'आम्ही ठीक खेळत आहोत. पण ही आमची सर्वश्रेष्ठ कामगिरी नाही, याची आम्हाला जाणीव आहे. असं असलं तरी, अजूनही स्पर्धा बाकी आहे. आमचं लक्ष्य पुढील सामन्यांवर आहे. आम्ही फक्त 5 मॅच जिंकल्या आहेत. आता उर्वरित 2 मॅच चांगल्या फरकानं जिंकल्या आणि अन्य काही मॅचचे निर्णय आम्हाला हवे तसे लागले, तर आम्हाला अजूनही 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याची संधी आहे.' असे त्याने सांगितले. बॉलर्सनी चांगली संधी दिली दिल्ली विरुद्ध झालेल्या पराभवाबद्दल बॉन्ड म्हणाला की, 'आम्ही 145 च्या आसपास रन केले असते तर आम्हाला जिंकण्याची संधी होती. आमचा हा विचार बॉलर्सनी जवळपास सिद्ध केला. त्यांनी आम्हाला मॅच जिंकण्याची संधी दिली. पण, माझ्या मते दिल्लीनं मिडल ओव्हर्समध्ये चांगली बॅटींग केली. या स्कोअरचा बचाव करणे अवघड जाईल याची आम्हाला कल्पना होती.' IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर रोहित शर्मा निराश! सांगितलं, टीमच्या अपयशाचं मुख्य कारण मुंबई इंडियन्सनं या आयपीएलमध्ये 12 पैकी  5 मॅच जिंकल्या असून 7 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. कोलकाता, पंजाब, राजस्थान आणि मुंबई या चारही टीमनी तेवढ्याच मॅच खेळल्या असून त्यांचे पॉईंट्सही समान आहेत. पण नेट रनरेटमुळे कोलकाता चौथ्या, पंजाब पाचव्या, राजस्थान सहाव्या आणि मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. IPL 2021, Points Table: राजस्थानच्या विजयानं वाढली पॉईंट टेबलमधील चुरस, वाचा कोणत्या टीमला आहे संधी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या