मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: 11 वर्षांच्या अनुभवी बॉलरवर भारी पडला 19 वर्षांचा यशस्वी! नव्या विक्रमाची केली नोंद

IPL 2021: 11 वर्षांच्या अनुभवी बॉलरवर भारी पडला 19 वर्षांचा यशस्वी! नव्या विक्रमाची केली नोंद

राजस्थान रॉयल्सनं (RR) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 7 विकेट्सनं पराभव केला. 19 वर्षांचा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं सीएसकेच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली.

मुंबई, 3 ऑक्टोबर :  राजस्थान रॉयल्सनं (RR) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 7 विकेट्सनं पराभव केला. सीएसकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 189 रन केले होते. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 190 रनचं टार्गेट 15 बॉल आणि 7 विकेट्स राखून पूर्ण केलं. 19 वर्षांचा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं सीएसकेच्या बॉलर्सची जोरदार धुलाई केली. यशस्वीनं 21 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं आक्रमक अर्धशतक झळकावलं.

19 वर्षांच्या यशस्वीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 11 वर्षांचा अनुभव असलेल्या जोश हेजलवुडची (Josh Hazelwood) जोरदार धुलाई केली. त्यानं हेजलवुडच्या बॉलिंगवर मैदानातील चारही दिशांना फटकेबाजी केली. यशस्वीनं हेजलवूडच्या दोन ओव्हरमध्ये  2,4,0,2,4,4,0,6,6,4,6,0  असे एकूण 38 रन काढले. यशस्वीनं हेजलवुडच्या एका ओव्हरमध्ये 22 रन काढले. यशस्वीच्या धुलाईमुळे हेजलवुडसाठी शनिवारचा दिवस भलताच त्रासदायक ठरला. त्यानं 4 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 54 रन काढले.

यशस्वीचा विक्रम

यशस्वीनं त्याचं अर्धशतक फक्त 19 बॉलमध्ये पूर्ण केलं. आयपीएल स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तो दुसरा अनकॅप खेळाडू बनला आहे. अनकॅप खेळाडूंमध्ये वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या इशान किशनच्या (Ishan Kishan) नावावर आहे. त्यानं 17 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले आहे.

MOST SIXES:

चेन्नईने ठेवलेल्या 190 रनच्या आव्हानचा पाठलाग करताना राजस्थानचे ओपनर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) यांनी धमाक्यात सुरुवात केली. जयस्वाल आणि एव्हिन लुईस यांच्या जोडीने राजस्थानला 5 ओव्हरमध्ये 77 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. 21 बॉलमध्ये 50 रन करून जयस्वाल आऊट झाला. त्याने या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स मारले. शिवम दुबे (Shivam Dubey) याने 42 बॉलमध्ये नाबाद 64 रन केले, यात 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 आणि आसिफने एक विकेट घेतली.

IPL 2021, Points Table: राजस्थानच्या विजयानं वाढली पॉईंट टेबलमधील चुरस, वाचा कोणत्या टीमला आहे संधी

First published:
top videos

    Tags: IPL 2021, Rajasthan Royals