मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, RR vs CSK : महेंद्रसिंह धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध करणार 'द्विशतक'!

IPL 2021, RR vs CSK : महेंद्रसिंह धोनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध करणार 'द्विशतक'!

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस करण्यासाठी मैदानात उतरताच महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) द्विशतक पूर्ण करणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 ऑक्टोबर : या आयपीएलमध्ये (IPL 2021) चेन्नई सुपर किंग्सची टीम (Chennai Super Kings) जबरदस्त फॉर्मात आहे. सीएसकेनं आत्तापर्यंत 11 पैकी 9 मॅच जिंकल्या आहेत. त्याचबरोबर 'प्ले ऑफ' मध्ये दाखल झालेली ती पहिली टीम आहे. चेन्नईचा शनिवारी सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध (RR vs CSK) होणार आहे. या मॅचमध्ये चेन्नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी 'द्विशतक' पूर्ण करणार आहे.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या मॅचमध्ये टॉस करण्यासाठी मैदानात उतरताच धोनी हे द्विशतक पूर्ण करणार आहे. तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा धोनी हा आयपीएल  स्पर्धेतील सर्वात यशस्वी कॅप्टनपैकी एक आहे. शनिवारी धोनी सीएसकेचा कॅप्टन म्हणून 200 वी मॅच खेळणार आहे.  एकाच फ्रँचायझीकडून कॅप्टन म्हणून धोनीची ही 200 वी मॅच असेल.

IPL 2021 : ...तेव्हा संतापलेला धोनी अश्विनला ओरडला, सेहवागचा धक्कादायक खुलासा

धोनीनं आजवर सीएसकेचा कॅप्टन म्हणून 199 मॅच खेळल्या आहेत. यापैकी 119 मॅचमध्ये विजय मिळवला असून 79 मॅचमध्ये पराभव सहन केला आहे. तर एका मॅचचा कोणताही निकाल लागला नाही. आयपीएलमधील धोनीची विजयाची टक्केवारी 66.10  आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची विजयाची टक्केवारी 59.52 इतकी आहे.

MI vs DC, Dream 11 Prediction: 'या' 11 जणांवर आजमवा तुमचं नशीब

धोनी 2008 साली झालेल्या आयपीएलच्या पहिल्या सिझनपासून सीएसकेचा कॅप्टन आहे. सट्टेबाजी प्रकरणामुळे सीएसकेवर दोन वर्षांचा बॅन होता. त्यावेळी धोनी पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. धोनी पहिल्यांदा पुण्याच्या टीमचा कॅप्टन होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याला हटवून स्टीव्ह स्मिथला कॅप्टन करण्यात आले. 2018 साली धोनी पुन्हा सीएसकेचा कॅप्टन झाला. त्यावर्षी सीएसकेनं तिसऱ्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni