मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : ...तेव्हा संतापलेला धोनी अश्विनला ओरडला, सेहवागचा धक्कादायक खुलासा

IPL 2021 : ...तेव्हा संतापलेला धोनी अश्विनला ओरडला, सेहवागचा धक्कादायक खुलासा

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एमएस धोनी अश्विनवर संतापल्याचा किस्सा सांगितला. ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) विकेट घेतल्यानंतर अश्विनने (R Ashwin) केलेलं सेलिब्रेशन एमएस धोनीला रुचलं नाही, असं सेहवाग म्हणाला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) एमएस धोनी अश्विनवर संतापल्याचा किस्सा सांगितला. ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell) विकेट घेतल्यानंतर अश्विनने (R Ashwin) केलेलं सेलिब्रेशन एमएस धोनीला रुचलं नाही, असं सेहवाग म्हणाला. सेहवागने ही घटना नेमकी कधी घडली हे सांगितलं नसलं तरी 2014 साली आयपीएल क्वालिफायर-2 मध्ये हा प्रकार झाला होता. मॅक्सवेलची विकेट घेतल्यानंतर अश्विनने खेळपट्टीच्या बाजूला असलेली घाण हातात घेतली आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेने भिरकवली, त्यावेळी आपण नॉन-स्ट्रायकर एण्डला उभे होतो, असं सेहवागने सांगितलं. त्यावेळी अश्विन चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) तर सेहवाग पंजाबकडून (Punjab Kings) आयपीएलमध्ये खेळत होता.

अश्विनने केलेला प्रकार मला अजिबात आवडला नव्हता, पण तेव्हा मी समोर येऊन काहीच बोललो नाही. एमएस धोनीही तेव्हा प्रचंड संतापला होता आणि तो अश्विनला ओरडला, असं सेहवाग क्रिकबझसोबत बोलताना म्हणाला. आयपीएल 2021 मध्ये अश्विन आणि मॉर्गन यांच्यात झालेल्या वादावर सेहवागने प्रतिक्रिया दिली.

'अश्विनने तेव्हा केलेलं सेलिब्रेशन मला आवडलं नव्हतं, त्यावेळी जर एखाद्या खेळाडूने सोशल मीडियावर किंवा मीडियामध्ये घडलेला प्रकार सांगितला असता तर मोठा वाद झाला असता. ही खेळाडूंची जबाबदारी आहे. मैदानात जे काही होतं ते मैदानातच ठेवलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी बाहेर यायला लागल्या, तर तुम्हाला प्रत्येक सामन्यानंतर वाद दिसेल. स्पिरीट ऑफ द गेम म्हणजे खेळाडूंनी मैदानातल्या गोष्टी मैदानातच ठेवल्या पाहिजेत,' असं वक्तव्य सेहवागने केलं.

IPL 2021 : 'तेव्हा मॉर्गन लॉर्ड्सबाहेर आंदोलनाला बसला होता', सेहवागचा 'सिक्सर'!

काय झाला वाद?

केकेआरचा (KKR) कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि दिल्लीचा (DC) अनुभवी बॉलर आर. अश्विन (R. Ashwin) यांच्यात भर मैदानात वाद झाला होता. मॅच संपल्यानंतर हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या दिनेश कार्तिकनं मैदानात काय घडलं ते सांगितलं होतं. दिल्लीची बॅटिंग सुरू असताना राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) फेकलेला थ्रो बॅटिंग करत असलेल्या ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शरिराला लागला आणि दुसरीकडे गेला. अश्विनने या संधीचा फायदा घेत रन काढण्याचा प्रयत्न केला.

अश्विनने केलेला हा रन काढण्याचा प्रयत्न मॉर्गनला आवडला नाही, त्यामुळे हे दोघं मैदानातच एकमेकांना भिडले. सामना संपल्यानंतरही याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले, काही जणांनी अश्विनवर टीका केली, तर अनेकांनी त्याची बाजू घेतली. अखेर वाद वाढत असल्याचं पाहून अश्विनने एकामागोमाग एक अशी सहा ट्वीट करून या वादावर स्पष्टीकरण दिलं.

मैदानातील वादावर अश्विनचं खणखणीत उत्तर, मॉर्गनला समजावली 'Spirit of the game’ ची व्याख्या

First published:

Tags: IPL 2021, MS Dhoni, R ashwin, Virender sehwag