मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: रोहित शर्माच्या मुलीने केली बाबांच्या पुल शॉटची नक्कल, पाहा VIDEO

IPL 2021: रोहित शर्माच्या मुलीने केली बाबांच्या पुल शॉटची नक्कल, पाहा VIDEO

मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका (Ritika Sajdeh) त्यांची मुलगी समीराला (Samira) काही प्रश्न विचारताना दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 31 मार्च :  भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेनंतर (India vs England) टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या आयपीएल टीममध्ये दाखल झाले आहेत. येत्या 9 एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) सुरू होत आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील सोमवारी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाला आहे. यंदा आयपीएल विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याचा रोहितचा प्रयत्न असेल.

क्रिकेटपटू आयपीएल स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबल (bio-bubble) मध्ये दाखल झाले आहेत. काही फ्रँचायझींनी खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबीयांना देखील राहण्याची परवानगी दिली आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

या व्हिडीओमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका (Ritika Sajdeh) त्यांची मुलगी समीराला (Samira) काही प्रश्न विचारताना दिसत आहे. समीराने मुंबई इंडियन्सचं हेल्मेट या व्हिडीओत घातलं असून ती रोहितच्या प्रसिद्ध पुल शॉटची नक्कल देखील करत आहे. हेल्मेट घातल्यानंतर समीरा 'ऋषभ चाचू' (Rishabh Pant) सारखी दिसत असल्याचं रितिका म्हणते.

इतकंच नाही, तर त्या हेल्मेटवरील लोगो हा मुंबई इंडियन्सचा असल्याचं समीरानं अगदी अचूक ओळखलं आहे. इतक्या लहान वयात समीराला मुंबई इंडियन्सचा लोगो ओळखता येतो ही आश्चर्याची बाब असल्याचं मत हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण व्यक्त करत आहे.

From a mini pull-shot 😍 to an MI cheer chant ➡️ Sammy’s #IPL2021 plan is ready ✅#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 @ritssajdeh pic.twitter.com/vPnTCjLVLc

— Mumbai Indians (@mipaltan) March 31, 2021

9 एप्रिलपासून यावर्षीच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील लढतीनं या स्पर्धेचा 14 वा सिझन सुरू होईल. यंदाच्या सिझनमध्ये कोणतीही टीम त्यांच्या होम ग्राऊंडवर सामना खेळणार नाही. मुंबई इंडियन्सची पहिली मॅच ही चेन्नईत होणार आहे.

( वाचा : IPL 2021 : BCCI ने बदलला आयपीएलचा नियम, सगळ्या टीम अडचणीत )

भारत- इंग्लंड मालिकेनंतर रोहित शर्मासह हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे चारही खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातली सीरिजही बायो-बबलमध्ये खेळवण्यात आली. बीसीसीआयच्या नियमांनुसार एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जाण्यासाठी खेळाडूंना क्वारंटाईन व्हायची गरज नाही,

First published:

Tags: Cricket, IND Vs ENG, IPL 2021, Mumbai Indians, RCB, Rohit sharma, Sports, Twitter