मुंबई, 30 मार्च : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगसाठी सगळ्या टीमनी तयारीही सुरू केली आहे. कोरोना व्हायरसमुळे मागच्यावर्षी युएईमध्ये झालेली स्पर्धा यावेळी भारतात होणार आहे. आयपीएलच्या या मोसमातला पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यात चेन्नईमध्ये होईल. आयपीएलचा हा मोसम सुरू होण्याआधी बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेसाठी नव्या नियमांची घोषणा केली आहे, पण हा नियम सगळ्याच टीमसाठी मोठी अडचण ठरू शकतो.
बीसीसीआयच्या नियमांनुसार आता प्रत्येक टीमला 90 मिनिटांमध्ये 20 ओव्हर पूर्ण कराव्या लागणार आहेत. याआधी 90 व्या मिनिटाला 20वी ओव्हर सुरू व्हायची. 90 मिनिटांमध्ये प्रत्येक टीमला अडीच-अडीच मिनिटांचे दोन टाईम आऊट मिळायचे. म्हणजेच प्रत्येक टीमला 85 मिनिटांमध्ये 20 ओव्हर टाकणं बंधनकारक आहे. या हिशोबाने प्रत्येक टीमला एका तासाला 14 पेक्षा जास्त ओव्हर टाकाव्या लागणार आहेत. टीमनी जर वेळेत ओव्हर पूर्ण केल्या नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सॉफ्ट सिग्नल नाही
आयपीएल 2021 मध्ये सॉफ्ट सिगन्लचा (Soft Signal) नियमही लागू नसेल. भारत-इंग्लंड सीरिजमध्ये सॉफ्ट सिग्नलमुळे बराच वाद निर्माण झाला होता. सूर्यकुमार यादवचा कॅच नीट पकडलेला आहे का नाही, हे थर्ड अंपायरलाही कळत नव्हतं, पण मैदानातल्या अंपायरने सॉफ्ट सिग्नल आऊट दिल्यामुळे थर्ड अंपायरला सूर्यकुमार यादवला आऊट द्यावं लागलं. या नियमावर कर्णधार विराट कोहली आणि क्रिकेट तज्ज्ञांनीही आक्षेप घेतले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, IPL 2021