मुंबई, 22 सप्टेंबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) यानं मागच्या आठवड्यात क्रिकेट फॅन्सना दोन धक्के दिले. त्यानं सर्वप्रथम आगामी टी20 वर्ल्ड कपनंतर टी20 फॉर्मेटमधील कॅप्टनसी सोडणार असल्याचं जाहीर केलं. पुढील महिन्यात ही वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी त्यानं या आयपीएलनंतर (IPL 2021) आपण आरसीबीची कॅप्टनसी सोडणार असल्याचं जाहीर केलं. या दोन धक्क्यानंतर विराट आता तिसरा धक्का देण्याच्या तयारीत आहे. विराटनं वर्कलोडचं कारण देत या दोन्ही टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट 2016 पासून टीम इंडियाची सर्व फॉर्मेटमध्ये कॅप्टनसी करत आहे. तर 2013 पासून आरसीबीचा कॅप्टन आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी विराट 33 वर्षांचा होणार असून त्याचा फिटनेस पाहता तो आणखी 4 ते 5 वर्ष क्रिकेट खेळू शकतो. पण, त्याचवेळी आपलं करिअर अधिक काळ राहावं यासाठी तो एक प्रकार सोडून देण्याची शक्यता आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण हे दिग्गज क्रिकेटपटू त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात फक्त टेस्ट क्रिकेट खेळत होते. विराट देखील त्यांचं अनुकरण करत एक फॉर्मेट सोडण्याच्या विचारात आहे. मोठी बातमी: RCB मध्ये होणार भूकंप! विराट कोहलीची कर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार? ‘दैनिक भास्कर’ च्या वृत्तानुसार टी20 वर्ल्ड कपनंतर विराट हा फॉर्मेट खेळण्याची शक्यता कमी आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये नक्की खेळेल. पण टी 20 इंटरनॅशनल क्रिकेट खेळणार नाही. मागील चार वर्षांमध्येही विराटनं अनेकदा आंतरराष्ट्रीय टी20 मॅचमधून ब्रेक घेतला होता. त्यापैकी 19 मॅचमध्ये रोहित शर्मानं (Rohit Sharma) कॅप्टनसी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.