चेन्नई, 14 एप्रिल : पहिली मॅच पराभूत झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादची टीम
(SRH) मोठ्या तयारीनं दुसऱ्या मॅचमध्ये उतरली आहे. हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं
(David Warner) सुरुवातीपासून बॉलिंगमध्ये योग्य बदल केले. त्याचा त्याला फायदा झाला.
सनरायझर्स हैदराबादचं मुख्य अस्त्र असलेल्या राशिद खानचा
(Rashid Khan) वॉर्नरनं योग्य उपयोग केला. आरसीबीच्या बॅटींगचा कणा हा एबी डीव्हिलियर्स
(AB de Villiers) आहे. डीव्हिलियर्स खेळला तर मॅच हातातून जाण्यास वेळ लागणार नाही, याची वॉर्नरला जाणीव होती. त्यामुळे वॉर्नरनं डीव्हिलियर्ससाठी राशिद खानला राखून ठेवलं होतं.
वॉर्नरनं डीव्हिलियर्ससाठी राशिदच्या दोन ओव्हर्स राखून ठेवल्या होत्या. विराट कोहली 13 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर लगेच 14 व्या ओव्हरमध्ये वॉर्नरनं राशिदच्या हातामध्ये बॉल दिला. राशिदनं कॅप्टनचा हा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं चौथ्याच बॉलवर डीव्हिलियर्सला आऊट केलं. विशेष म्हणजे स्वत: वॉर्नरनंच त्याचा कॅच घेतला. डीव्हिलियर्सनं फक्त 1 रन काढला.
राशिद खाननं मॅचच्या निर्णयाक क्षणी दोन ओव्हर बॉलिंग केली. त्यानं त्या दोन ओव्हरमध्ये डीव्हिलियर्स पाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरला आऊट करत आरसीबीआला आणखी अडचणीत आलं. राशिद खाननं त्याच्या चार ओव्हरमध्ये फक्त 18 रन देत 2 विकेट्स घेतल्या.
(
वाचा : शाहरुख खानच्या नाराजीवर आंद्रे रसेलनं दिलं उत्तर, म्हणाला... )
या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नर
(David Warner) याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी बंगळुरुनं एक बदल केला असून देवदत्त पडिक्कलचा
(Devdutt Padikkal) रजत पाटीदार याच्या जागेवर समावेश केला आहे. तर हैदराबादच्या टीममध्ये दोन बदल झाले असून जेसन होल्डर आणि शादाब नदीमचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.