मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : किरण मोरेंना कोरोना झाल्यावर मुंबई इंडियन्सची कोविड टेस्ट, पाहा काय आला रिपोर्ट

IPL 2021 : किरण मोरेंना कोरोना झाल्यावर मुंबई इंडियन्सची कोविड टेस्ट, पाहा काय आला रिपोर्ट

आयपीएलच्या (IPL 2021) या मोसमाला सुरूवात होण्याच्या तीन दिवस आधीच मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) धक्का बसला आहे. टीमचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे (Kiran More) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आयपीएलच्या (IPL 2021) या मोसमाला सुरूवात होण्याच्या तीन दिवस आधीच मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) धक्का बसला आहे. टीमचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे (Kiran More) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आयपीएलच्या (IPL 2021) या मोसमाला सुरूवात होण्याच्या तीन दिवस आधीच मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) धक्का बसला आहे. टीमचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे (Kiran More) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई, 6 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) या मोसमाला सुरूवात होण्याच्या तीन दिवस आधीच मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) धक्का बसला आहे. टीमचे टॅलेंट स्काऊट किरण मोरे (Kiran More) यांना कोरोनाची लागण झाली आहे. किरण मोरेंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच टीमच्या सगळ्या खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली. खेळाडूंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे मुंबई इंडियन्सना दिलासा मिळाला आहे. किरण मोरे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं समजल्यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सनी त्यांचं सराव सत्र थांबवलं. मुंबईची टीम ही सध्या चेन्नईमध्ये आहे.

58 वर्षांचे किरण मोरे मुंबई इंडियन्सने विकेट कीपिंग सल्लागारही आहेत. किरण मोरे यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत, तसंच त्यांनी स्वत:ला विलगिकरणात ठेवलं आहे. मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे यांनी बीसीसीआयने दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन केलं आहे. मुंबई इंडियन्सची वैद्यकीय टीम किरण मोरेंच्या तब्येतीची काळजी घेत आहे, तसंच आम्ही बीसीसीआयचे नियम पाळत आहोत, असं ट्वीट मुंबई इंडियन्सने केलं आहे.

किरण मोरे यांच्याआधी दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल (Axar Patel), बँगलोरचा देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनाही कोरोनाची लागण झाली. हे दोन्ही खेळाडू आता विलगिकरणात आहेत. त्याआधी आज वानखेडे स्टेडियममधल्या आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. याआधी वानखेडे स्टेडियममधले 10 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आणि आयपीएलचं सुरक्षित आयोजन करण्यासाठी आता वानखेडे स्टेडियमचे (Wankhede Stadium) कर्मचारी घरी न जाता स्टेडियममध्येच राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे स्टेडियमच्या आत एक क्लब हाऊस आहे. तिकडेच आयपीएलचे सामने संपेपर्यंत कर्मचारी राहतील.

आयपीएल मॅचसाठी टीमना सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. आयपीएलच्या टीमना दोन सत्रात सराव करता येणार आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 आणि संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीमध्ये टीमना आणि स्टाफना मैदानात सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये टीम हॉटेल ते मैदान असा प्रवास करू शकतील.

9 एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. मुंबईमध्ये यावर्षी आयपीएलचे 10 सामने होणार आहेत. मुंबईमध्ये 10 ते 25 एप्रिल दरम्यान 10 मॅच होणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या चार टीमचे सामने मुंबईमध्ये होतील.

First published:

Tags: Corona, IPL 2021, Mumbai Indians