मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज परतल्यानं BCCI ची वाढली काळजी, जाणून घ्या कारण

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राज परतल्यानं BCCI ची वाढली काळजी, जाणून घ्या कारण

अफगाणिस्तानमध्ये  (Afghanistan) तालिबान राजवट परतली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली असून अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीनं BCCI ची चिंता वाढली आहे.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान राजवट परतली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली असून अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीनं BCCI ची चिंता वाढली आहे.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान राजवट परतली आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली असून अफगाणिस्तानमधील गंभीर परिस्थितीनं BCCI ची चिंता वाढली आहे.

मुंबई, 16 ऑगस्ट : अफगाणिस्तानमध्ये  (Afghanistan) तालिबान राजवट परतली आहे.  तालिबानच्या दहशतवाद्यांनी राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. तसंच तेथील अध्यक्षांच्या घरावरही त्यांचा झेंडा फडकावला आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हजारो नागरिक सध्या मिळेल त्या मार्गानं देश सोडत आहेत.

अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू राशिद खाननं (Rashid Khan) काही दिवसांपूर्वी जगभरातील नेत्यांना 'आम्हाला एकटं सोडू नका', असं आवाहन केलं होतं. गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटचा चांगला विकास झाला आहे. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेत चमकले आहेत. त्यांच्या देशातील परिस्थिती सध्या खालवल्यानं बीसीसीआयची (BCCI) चिंता वाढली आहे.

आयपीएल स्पर्धेच्या चौदव्या सिझनचा (IPL 2021) पुढील महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत राशिद खान आणि मोहम्मद नबी या अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या सहभागावर प्रश्न उपस्थित झाला आहे. हे दोघंही सध्या इंग्लंडमध्ये 'द हंड्रेड' ही क्रिकेट स्पर्धा खेळत आहे. राशिद ट्रेंट रॉकेट्सचं तर नबी लंडन स्पिरिट्स या टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. आता त्यांच्या देशातील परिस्थिती गंभीर असल्यानं हे दोघं आयपीएल स्पर्धेत खेळणार की माघार घेणार? याची काळजी बीसीसीआयला आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या काही बोलणे हे घाईचे ठरेल. आमचं परिस्थितीवर लक्ष आहे. राशिद आणि अन्य अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळतील अशी आम्हाला आशा आहे.' असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

ऑलिम्पिक गाजणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधान मोदींनी थोपटली पाठ, पाहा PHOTOS

इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धा 21 ऑगस्ट रोजी संपणार आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर राशिद आणि नबी घरी परतणार की इंग्लंडमध्येच थांबतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ते इंग्लंडमध्येच थांबले तर बीसीसीआय त्यांची विशेष विमानानं यूएईमध्ये येण्याची व्यवस्था करु शकते. टीम इंडिया 15 स्पटेंबर रोजी यूएईला रवाना होणार आहे. त्यांच्यासोबत हे खेळाडू यूएईला येतील.  राशिद आणि नबी दोघंही सनरायझर्स हैदराबादचे सदस्य आहेत.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Cricket news