ऑलिम्पिक गाजणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधान मोदींनी थोपटली पाठ, पाहा PHOTOS
टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) गाजवणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भेट घेतली. या सर्वांची मोदींनी यावेळी पाठ थोपटली, तसंच पुढील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची त्यांनी यावेळी पाठ थोपटली.
2/ 5
टोकयो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) गोल्ड मेडल जिंकत इतिहास घडवला. नीरज अंगात ताप असूनही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. मोदींनी यावेळी त्याचं विशेष अभिनंदन केलं.
3/ 5
बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावले आहे. टोकयोमधून परत आल्यावर एकत्र आईसक्रीम खाण्याचं आश्वासन मोदींनी सिंधूला दिले होते.
4/ 5
आजवरील ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी भारतानं टोकयो ऑलिम्पिकमध्ये केली आहे. भारतानं टोकयोमध्ये 1 गोल्ड, 2 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत.
5/ 5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खेळाडूंना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमातही निमंत्रित केले होते. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी सर्व खेळाडूंचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले होते.