मुंबई, 5 डिसेंबर : आयपीएल 2022 स्पर्धेचे (IPL 2022) पडघम वाजू लागले आहेत. आगामी सिझनपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) सर्वाधिक विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलला (Harshal Patel) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रिटेन केले नाही. त्यामुळे हर्षलचा पुन्हा एकदा ऑक्शनमध्ये समावेश होणार आहे. या ऑक्शनमध्ये हर्षलला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
हर्षल पटेलनं 'इंडियन एक्स्प्रेस' शी बोलताना त्याच्या क्रिकेट करिअरला कशामुळे कलाटणी मिळाली, हे सांगितलं आहे. टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर झहीर खान (Zaheer Khan) याने दिलेल्या सल्ल्यामुळे आपलं करिअर बदललं, असा गौप्यस्फोट हर्षलनं यावेळी केला.
'मी दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये होतो. त्यावेळी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या मॅचनंतर मला झहीर भाईला भेटण्याची संधी मिळाली. मला लेग स्टंपवर बॉल टाकण्यात अडचण येत होती. मी माझी समस्येवरील उत्तर शोधण्यासाठी झहीरकडे गेलो होतो. त्यांनी मला बॉल रिलिज करताना होत असलेली चूक सांगितली. मी माझा बॉल ऑफ स्टंपवर पिच केलं तर तो आपोआप लेगस्टंपवर ड्रिफ्ट होईल, असा सल्ला त्याने मला दिला.'
झहीरचा सल्ला फायदेशीर
झहीर खाननं समजावलं होतं, तशीच बॉलिंग हर्षललं केली. या सल्ल्यानंतर त्याचे संपूर्ण करिअर बदलून गेले. हर्षलनं आयपीएल 2021 मध्ये 32 विकेट्स घेतल्या. एका आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या रेकॉर्डची त्याने बरोबरी केली.
विराटनं दुर्लक्ष केलेल्या बॉलरची कमाल 21 विकेट्स घेत ठरला ' मॅन ऑफ द सीरिज'
हर्षलकडे डेथ ओव्हर्समध्ये विकेट्स घेण्याची क्षमता आहे. ही क्षमता त्यानं यावर्षीच्या आयपीएलमध्ये वारंवार सिद्ध केली. या कामगिरीमुळे त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये (India vs New Zealand T20 Series) खेळण्याची संधी मिळाली. त्या सीरिजमध्येही हर्षलनं दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, Ipl 2022