जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराटनं दुर्लक्ष केलेल्या बॉलरची कमाल 21 विकेट्स घेत ठरला ' मॅन ऑफ द सीरिज'

विराटनं दुर्लक्ष केलेल्या बॉलरची कमाल 21 विकेट्स घेत ठरला ' मॅन ऑफ द सीरिज'

विराटनं दुर्लक्ष केलेल्या बॉलरची कमाल 21 विकेट्स घेत ठरला ' मॅन ऑफ द सीरिज'

अबू धाबी टी10 लीग स्पर्धेचं विजेतेपद डेक्कन ग्लॅडिएटर्सने (Deccan Gladiators) पटकावले. जगभरातील आक्रमक बॅटर्सनं गाजवलेल्या या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ एक बॉलर ठरला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 डिसेंबर: अबू धाबी टी10 लीग स्पर्धेचं (Abu Dhabi T10 League) विजेतेपद डेक्कन ग्लॅडिएटर्सने (Deccan Gladiators) पटकावले आहे. डेक्कननं फायनलमध्ये दिल्ली बुल्सचा (Delhi Bulls) 56 रननं एकतर्फी पराभव केला. ऑल राऊंडर आंद्रे सरसेलाचा (Andre Russell) वादळी खेळ हे डेक्कनच्या विजयाचे वैशिष्ट्य होते. 32 बॉलमध्ये नाबाद 90 रन करणाऱ्या रसेलचा ‘मॅन ऑफ द मॅच’ देऊन गौरव करण्यात आला. रसेलसह जगभरातील आक्रमक बॅटर्सनी गाजवलेल्या या स्पर्धेत एका बॉलरला ‘मॅन ऑफ द सीरिज’ चा पुरस्कार देण्यात आला. श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदू हसरंगाला (Wanindu Hasaranga) या स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानं 12 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या. तसेच हसरंगाचा या स्पर्धेतील  इकोनॉमी रेट सर्वात कमी म्हणजे 8.47 इतका आहे. आयपीएल 2021 मध्ये  हसरंगा विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीकडून (RCB) खेळला, पण त्याला टीमने रिटेन केले नाही. हसरंगाला आरसीबीनं फक्त 2 मॅचमध्येच संधी दिली.

जाहिरात

हसरंगाने बांगला टायगर्स विरुद्ध फक्त 8 रन देत 5 विकेट्स घेतल्या होत्याा. ही त्याची टी10 कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं फायनल मॅचमध्ये 20 रन देत 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये दिल्लीकडून सर्वात जास्त रन करणाऱ्या हेमराजच्या विकेटचाही समावेश आहे. T10 League: रसेलच्या वादळात दिल्लीची वाताहत, डेक्कन पहिल्यांदाच चॅम्पियन हसरंगाने यापूर्वी टीम इंडिया विरुद्धची सीरिज तसेच टी20 वर्ल्ड कपमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. त्यापाठोपाठ टी10 स्पर्धाही त्यानं गाजवली आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL 2022) हसरंगाला मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात