मुंबई, 19 एप्रिल: आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवीरी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 6 विकेट्सनं पराभव झाला. केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या अर्धशतकांमुळे पंजाबने दिल्लीला (Punjab Kings vs Delhi Capitals) विजयासाठी 196 रनचं आव्हान दिलं. मयंकनं 69 तर राहुलनं 61 रन काढले. या दोघांच्या अर्धशतकानंतरही पंजाबचा पराभव झाला.
केएल राहुल सध्या या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅट्समनच्या यादीत शिखर धवन (186) आणि ग्लेन मॅक्सवेल (176) यांच्यानंचर तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र तरीही पंजाबची टीम तीनपैकी दोन सामन्यांमध्ये पराभूत झालेली असून आयपीएल पॉईंट टेबल (IPL 2021 Points Table) सातव्या क्रमांकावर आहे. राहुलनं या सिझनमध्ये दोन अर्धशतक झळकावली असून त्यापैकी एका सामन्यात पंजाबचा विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या पराभवात राहुलची संथ बॅटींग हे देखील कारण आहे. राहुलनं दिल्लीविरुद्ध 51 बॉलमध्ये 61 रन काढले. त्यानं पंजाबच्या इनिंगमधील 42 टक्के बॉल खेळले. यामध्ये त्याचा रनरेट हा 7.17 होता. जो मॅचच्या 10.25 या रनरेटपेक्षा खूप कमी होता. राहुलच्या संथ खेळीमुळे चांगल्या सुरुवातीनंतरही पंजाबला 200 चा आकडा ओलांडता आला नाही.
राहुलची आकडेवारी काय सांगते?
2018 नंतरचा विचार केला तर केएल राहुलनं अर्धशतक झळकावल्यानंतरही 10 सामन्यात त्याच्या टीमचा पराभव झाला आहे. या यादीमध्ये तो नंबर 1 वर आहे. राहुलनं आयपीएल स्पर्धेत 16 मॅचमध्ये 40 पेक्षा जास्त बॉल खेळले आहेत. त्यामध्ये त्याच्या टीमला 7 वेळा विजय मिळाला असून 9 वेळा पराभव सहन करावा लागला आहे. त्याची आयपीएलमधील विजयाची सरासरी ही 43.75 टक्के आहे.
राहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर! नियमांमध्ये बदलाची केली मागणी
तर, आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये राहुलनं 40 पेक्षा जास्त बॉल खेळल्यानंतर टीम इंडियानं 9 पैकी 8 सामने जिंकले असून फक्त एकाच सामन्यात पराभव झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलच्या खेळीची विजयातील सरासरी 88 टक्के आहे. त्यामुळे या आयपीएल सिझनमध्ये पंजाबला पुनरागमन करायचं असेल तर राहुलला अधिक वेगानं रन करणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crickrt, Delhi capitals, Ipl, IPL 2021, Kl rahul, Match, Punjab kings