मुंबई, 8 मे : आयपीएल स्पर्धेचा हा सिझन (IPL 2021) स्थगित झाला आहे. त्यानंतरही कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मधील कोरोनाचा कहर थांबलेला नाही. आता केकेआरचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) हा पॉझिटीव्ह आढळला आहे. प्रसिद्ध कृष्णा हा गेल्या सहा दिवसांमध्ये कोरोनाची लागण झालेला केकेआरचा चौथा खेळाडू आहे. यापूर्वी सोमवारी वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrier) यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्यानंतर केकेआरचा बॅट्समन टीम सिफर्ट (Tim Seifert) याला कोरोनाची लागण झाली आहे. बायो-बबलच्या बाहेर पडल्यानंतर कोरोना प्रसिद्ध कृष्णा आयपीएल स्पर्धेच्या बायो-बबलमधून बाहेर पडला तेंव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह होता. स्पर्धा स्थगित झाल्यानं तो बंगळुरुला परतला. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. कृष्णानं भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील वन-डे मालिकेच्या दरम्यान टीम इंडियात पदार्पण केलं. तीन वन-डे मॅचच्या त्या मालिकेत कृष्णानं सहा विकेट्स घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्ये स्टँडबाय म्हणून निवड झाली आहे. टीम सिफर्टला कोरोना केकेआरमधील न्यूझीलंडचा बॅट्समन टीम सिफर्टलाही कोरोनाची लागण झाली आहे. सिफर्ट अन्य खेळाडूंसोबत न्यूझीलंडला रवाना होणार होता. आता त्याच्यावर चेन्नईमध्ये उपचार करण्यात येणार आहेत.न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं याबाबत दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सिफर्टमध्ये कोरोनाची मध्यम लक्षणं आढळली आहेत. तो आता क्वारंटाईन कालावधी पूर्ण करेल. न्यूझीलंडमध्ये परत येण्यापूर्वी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह येणं आवश्यक आहे. न्यूझीलंडमध्ये परतल्यानंतरही त्याला 14 दिवस इतरांपासून वेगळं राहवं लागेल.” ‘या’ खेळाडूची निवड ठरली ऐतिहासिक, 46 वर्षात पहिल्यांदाच घडली अशी घटना " टीम सिफर्टचा यापूर्वी सात वेळा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. गेल्या 10 दिवसांमध्येच तो पॉझिटीव्ह आढळला आहे. ही टीमसाठी दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणात शक्य ती सर्व मदत आम्ही करणार आहोत," असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.