मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश

IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर  5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएल 2021 प्ले ऑफ (IPL 2021 Playoff) मध्ये जाण्याची आशा कायम आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएल 2021 प्ले ऑफ (IPL 2021 Playoff) मध्ये जाण्याची आशा कायम आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएल 2021 प्ले ऑफ (IPL 2021 Playoff) मध्ये जाण्याची आशा कायम आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 ऑक्टोबर :  मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये  (Sharjah Cricket Stadium) झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा  (Rajasthan Royals) 8 विकेट्सनं दणदणीत पराभव केला आहे. या मोठ्या विजयानंतर 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची आयपीएल 2021 प्ले ऑफ (IPL 2021 Playoff) मध्ये जाण्याची आशा कायम आहे.

कसा आहे पॉईंट टेबल?

दिल्ली कॅपिटल्स (DC), चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या टीमनं यापूर्वीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता या टीममध्ये टॉप 2 मध्ये येण्यासाठी चुरस सुरु आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी कोलकाता नाईट रायडर्सचं (KKR) मुंबई इंडियन्ससमोर आव्हान आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचपूर्वी 7 व्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं आता पॉईंट टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

13 मॅचनंतर 6 विजय आणि 7 पराजयासह मुंबई इंडियन्सचे 12 पॉईंट्स आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचेही 13 मॅचनंतर 12  पॉईंट्सच आहेत. मात्र केकेआरचा रनरेट (+0.29) हा मुंबई इंडियन्सच्या रनरेटपेक्षा (-0.04) पेक्षा जास्त आहे. त्यामुळे केकेआरची टीम सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्यांना टॉप 4 मध्ये जाण्याची अधिक संधी आहे. मात्र हे चित्र येत्या 2 दिवसांमध्ये बदलू शकतं.

POINTS TABLE:

कसा होणार मुंबईचा प्रवेश?

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) ही गुरुवारी होणारी मॅच मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये राजस्थाननं रॉयल्सचा मोठ्या फरकानं पराभव केला तर मुंबईचं काम सोपं होणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सनं शुक्रवारी होणाऱ्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा (SRH) मोठ्या फरकानं पराभव करावा लागणार आहे.

हैदराबाद विरुद्ध मुंबईला पहिल्यांदा बॅटींग केल्यास 90 रननं विजय मिळवणे आवश्यक आहे. दुसऱ्या बॅटींग केल्यास हैदराबादनं दिलेलं टार्गेट 11 ओव्हर्सच्या आता पूर्ण करावं लागेल. हैदराबादची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक झाली आहे. ही टीम आयपीएल स्पर्धेतून सर्वात प्रथम बाद झालीय. दुसरिकडं राजस्थान रॉयल्सचा मोठा पराभव केल्यानं मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे मुंबईला या पद्धतीनं विजय मिळण्याची शक्यता अधिक आहे.

IPL 2021, MI vs RR : मुंबईने राजस्थानला धूळ चारली, नेट रनरेटलाही बूस्टर डोस

दुसरी शक्यता

कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थानवर विजय मिळवला तर मुंबई इंडियन्सचा मार्ग बिकट होणार असला तरी तो बंद होणार नाही. कोलकाता विरुद्ध राजस्थान ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली तर केकेआरचा रनरेट कमी होईल. त्याचा फायदा मुंबई इंडियन्सला होईल. मुंबईची मॅच ही कोलकाताच्या नंतर असल्यानं त्यांना मॅचपूर्वीच नेमके टार्गेट समजेल. त्यापद्धतीनं रणनीती करुन मुंबई इंडियन्सनं टार्गेट पूर्ण केले तरीही मुंबईची टीम 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करेल.

First published:

Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians, Rajasthan Royals