मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, MI vs RR : मुंबईने राजस्थानला धूळ चारली, नेट रनरेटलाही बूस्टर डोस

IPL 2021, MI vs RR : मुंबईने राजस्थानला धूळ चारली, नेट रनरेटलाही बूस्टर डोस

आयपीएल 2021 च्या करो या मरो मुकाबल्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा (MI vs RR) लोळवलं आहे. राजस्थानने दिलेलं 91 रनचं आव्हान मुंबईने फक्त 8.2 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केलं.

  • Published by:  Shreyas

शारजाह, 5 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या करो या मरो मुकाबल्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा (MI vs RR) लोळवलं आहे. राजस्थानने दिलेलं 91 रनचं आव्हान मुंबईने फक्त 8.2 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावून पूर्ण केलं. इशान किशनने (Ishan Kishan) 25 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. तर रोहित शर्माने (Rohit Sharma) 22 आणि सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 13 रन केले. हार्दिक पांड्या 5 रनवर नाबाद राहिला. राजस्थानविरुद्धचा सामना मुंबईला फक्त जिंकायचाच नव्हता, पण मोठ्या फरकाने जिंकायचा होता. या धमाकेदार विजयामुळे मुंबईच्या नेट रनरेटलाही बूस्टर डोस मिळाला आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचआधी मुंबईचा नेट रन रेट -0.453 एवढा होता, तर या सामन्यानंतर हाच नेट रनरेट -0.048 झाला आहे. या विजयामुळे मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याचं स्वप्नही अजून कायम आहे. तर प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं राजस्थानचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलं आहे.

आयपीएल 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सची  (Mumbai Indians vs Rajasthan Royals) अवस्था अत्यंत बिकट केली. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईच्या बॉलर्सनी राजस्थानला 20 ओव्हरमध्ये फक्त 90 रन करून दिले. मुंबईच्या बॉलर्सनी राजस्थानच्या 9 विकेट घेतल्या. नॅथन कुल्टर-नाईलने आपल्या आयपीएल करियरमधली सर्वोत्तम कामगिरी केली. कुल्टर नाईलने आपल्या 4 ओव्हरमध्ये 14 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या जेम्स नीशम यानेही 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट मिळाल्या. राजस्थानकडून एव्हिन लुईसने सर्वाधिक 24 रन केल्या.

या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईने टीममध्ये दोन बदल केले. क्विंटन डिकॉकऐवजी जेम्स नीशमची टीममध्ये निवड झाली, तर कृणाल पांड्याऐवजी ईशान किशनचं टीममध्ये पुनरागमन झालं.

First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Rajasthan Royals