• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, Points Table : पंजाबच्या विजयानं मुंबईला दिलासा, पाहा कशी आहे Play off ची संधी

IPL 2021, Points Table : पंजाबच्या विजयानं मुंबईला दिलासा, पाहा कशी आहे Play off ची संधी

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शुक्रवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 5 विकेट्सनं पराभव केला आहे. या विजयानं मुंबई इंडियन्सच्या (MI) 'प्ले ऑफ' च्या आशा वाढल्या आहेत.

 • Share this:
  दुबई, 2 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) शुक्रवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं (Punjab Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 5 विकेट्सनं पराभव केला आहे. कॅप्टन के.एल. राहुलचं (KL Rahul) अर्धशतक आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) याने शेवटच्या ओव्हरमधील केलेल्या फटकेबाजीमुळे पंजाबनं स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. पंजाबची टीम या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये एक क्रमांक वर आली आहे. सध्या कोलकाता (KKKR), पंजाब (PBKS) आणि मुंबई (MI) या तिन्ही टीमचे प्रत्येकी 10 पॉईंट्स आहेत. या तीन टीममध्ये कोलकाताचा रनरेट सर्वात चांगला असून ती टीम चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पंजाबची टीम पाचव्या तर मुंबईची टीम सहाव्या क्रमांकावर आहे. या तिन्ही टीमचे पॉईंट्स समान आहेत. त्यामुळे प्ले ऑफची चुरस वाढली आहे. हार्दिकच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत, हा खेळाडू घेईल 'ऑलराऊंडर'ची जागा, गावसकरांना विश्वास मुंबई इंडियन्सला दिलासा तिन्ही टीमचे पाँईट्स समान असले तरी या तिघांमध्ये मुंबई इंडियन्सला पुढे जाण्याची सर्वाधिक संधी आहे. याचं कारण म्हणजे पंजाब आणि कोलकाताच्या आता आणखी दोन मॅच शिल्लक आहेत. तर मुंबईच्या तीन मॅच बाकी आहेत. त्यामुळे पंजाब आणि कोलकातानं उरलेल्या दोन्ही मॅच जिंकल्या तरी त्यांचे जास्तीत जास्त 14 पॉईंट्स होतील. तर मुंबईनं उर्वरित 3 मॅच जिंकल्या तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील. त्यामुळे मुंबई इंडियन्सची टीम केकेआर आणि पंजाब किंग्ज यांना मागे टाकून 'प्ले ऑफ' साठी क्वालिफाय होऊ शकेल. POINTS TABLE: मुंबई इंडियन्सची आगामी मॅच दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) शनिवारी होणार आहे. दिल्लीच्या टीमनं 11 मॅचमध्ये 8 विजय मिळवले असून ते पॉईंट टेबलमध्ये सध्या 16 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तसंच पंजाब किंग्जच्या विजयानं त्यांनी 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. टॉप 2 मध्ये जाण्यासाठी दिल्लीला उर्वरित तीन मॅचपैकी जास्तीत जास्त मॅच जिंकणे आवश्यक आहे. तर मुंबई इंडियन्सलाही यापुढील प्रत्येक मॅच जिंकणे आवश्यक असल्यानं दोघांमधील मॅच चुरशीची होणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: