Home /News /sport /

IPL 2021 : आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांबाबत बटलरचे मोठे वक्तव्य, म्हणाला...

IPL 2021 : आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांबाबत बटलरचे मोठे वक्तव्य, म्हणाला...

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या तोंडावर देश की आयपीएल? हा वाद पुन्हा सुरु झाला आहे. आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांवर जोस बटलर (Jos Buttler) याने मोठे वक्तव्य केले आहे.

    अहमदाबाद, 10 मार्च : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या तोंडावर देश की आयपीएल? हा वाद पुन्हा सुरु झाला आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील मालिका 2 जूनपासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हा वाद सुरु झाला आहे. या वादावर इंग्लंडचा विकेटकिपर-बॅट्समन जोस बटलर (Jos Buttler) याने प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल स्पर्धा खेळल्यानंतर होणाऱ्या आर्थिक फायद्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही, असे मत बटलरनं व्यक्त केले आहे. त्याचबरोबर आपल्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) न्यूझीलंड विरुद्धची टेस्ट सीरिज खेळण्यासाठी आयपीएल स्पर्धा अर्धवट सोडण्याची कोणतीही सूचना दिलेली नाही, असे बटलरने स्पष्ट केले आहे. बटलर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील वन-डे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतामध्ये आला आहे. या मालिकेनंतर तो आयपीएल स्पर्धा खेळल्यानंतरच इंग्लंडला जाणार आहे. बटलर आयपीएलमुळे न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका न खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रिटीश मीडियानं बटलवर जोरदार टीका केली आहे. अहमदाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना बटलर म्हणाला की, 'माझी या विषयावर कुणासोबतही चर्चा झालेली नाही. अन्य खेळाडूंबद्दल मला कल्पना नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेची घोषणा करण्यापूर्वी खेळांडूच्या आयपीएल टीमसोबत असलेल्या कराराबाबत विचार केला जाईल, अशी आशा आहे.' असे बटलरने सांगितले. (हे वाचा-मैदानात उतरण्यापूर्वी हार्दिक पांड्याने केला बदल; इंग्लंड थर-थर कापेल) आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) टीमचा सदस्य असलेल्या बटलरने पुढे सांगितले की, 'आयपीएल स्पर्धेमुळे काही खेळाडू न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेऊ शकतात. आम्हा सर्वांनाच आयपीएलचा मोठा फायदा आहे. ही मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे चांगली कमाई होते. तसेच यामध्ये मोठा अनुभवही मिळतो. या स्पर्धेचे  वेळापत्रक खडतर आहे. त्यामध्ये संतुलन नाही. ईसीबी आणि खेळाडू  हे संतुलन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.' इंग्लंडचे 12 खेळाडू या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2021) सहभागी होणार आहेत. यामध्ये इंग्लंडच्या मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा कॅप्टन इऑन मॉर्गनचा देखील समावेश आहे. (हे वाचा- मैदानात कुणालाही न घाबरणारा सचिन कोरोना टेस्टच्या दरम्यान ओरडतो तेव्हा... पाहा VIDEO ) बॉयकॉट यांनी केली होती टीका इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट (Geoffrey Boycott) यांनी यापूर्वी इंग्लंडच्या राष्ट्रीय टीमपेक्षा आयपीएलला महत्त्व देणाऱ्या खेळाडूंवर जोरदार टीका केली होती. या खेळाडूंबद्दल इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांचे धोरण नरम आहे. त्यांनी आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंच्या पैशांंमध्ये कपात करावी, असे मत व्यक्त केले होते. मात्र आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना त्याच्या कमाईमधील 10 टक्के हिस्सा क्रिकेट बोर्डाला द्यावा लागतो याचा त्यांना विसर पडला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021

    पुढील बातम्या