नवी दिल्ली, 9 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा (Indian Cricket Team) ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने इंग्लंड (England) विरोधात खेळल्या जाणाऱ्या टी20 सीरीज (T20 Series) साठी तयारी सुरू केली आहे. त्याने आपल्या खेळात बरेच बदल केले आहे. आणि सध्या तो नेटवर जोरदार तयारी करीत आहे. हार्दिक इंग्लंड विरोधात कोणतीही कमी ठेवू इच्छित नाही. हार्दिकने आपल्या ट्विटरवर सराव करीत असतानाही एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्य कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), फलंदाज कोच विक्रम राठोड आणि कर्णधार विराट कोहलीदेखील सरावादरम्यान उपस्थित होते. भारताला इंग्लंडविरोधात पाच सामान्यांची टी20 सीरीज खेळायची आहे. सीरीजचे सर्व सामाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. या स्टेडियमवर दोन्ही टीम्सनी शेवटचे दोन टेस्ट मॅच खेळले होते. टी 20 सीरीजची पहिली मॅच शुक्रवारी खेळली जाणार आहे. हार्दिक इंग्लंडविरोधात टेस्ट सीरीजमध्ये खेळू शकला नव्हता.india हे ही वाचा- Vijay Hazare Trophy : टीम इंडियाचा डच्चू शॉच्या जिव्हारी, केली 185 रनची खेळी
Preparation done ✅🇮🇳
— hardik pandya (@hardikpandya7) March 9, 2021
Can’t wait to get on the field on 12th 🌪 pic.twitter.com/Nyr6Bys2EF
सीरीजची प्रतीक्षा हार्दिकने एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर अपलोड केला आहे. यात तो फलंदाजीचा अभ्यास करीत असताना दिसत आहे. यात तो लांबचं लांब शॉट्स खेळताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी हार्दिक बॉलिंग करतानाही दिसत आहे. या व्हिडिओत हार्दिकने लिहिलं आहे की, तयारी पूर्ण…12 तारखेला मैदानावर येण्याची प्रतीक्षा. अॅक्शनमध्ये केला बदल हार्दिकने 2019 मध्ये कमरेत स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने फारशी बॉलिंग केली नाही. ऑस्ट्रेलियामध्ये वनडे मॅचमध्ये त्यांना बॉलिंग कावी लागली होती, त्यामुळे तो आपल्या अॅक्शनमध्ये बदल करीत होता. न्यूज एजन्सी पीटीआयने टेस्ट फलंदाज असलेले देवांग गांधी यांच्या हवाल्याने लिहिलं आहे की, असं दिसतंय की त्यांची जम्प लहान झाली असल्याने त्यांच्या अॅक्शनमध्ये बदल झाला आहे.