जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2021, MI vs RCB: ही आहे दोन्ही टीमची संभाव्य Playing XI

IPL 2021, MI vs RCB: ही आहे दोन्ही टीमची संभाव्य Playing XI

IPL 2021, MI vs RCB: ही आहे दोन्ही टीमची संभाव्य Playing XI

इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या बड्या लढतीनं होणार आहे. पहिल्या मॅचमध्ये मुंबई बड्या खेळाडूला आराम देण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 9 एप्रिल: इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या बड्या लढतीनं होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात विजयानं करण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन्ही कॅप्टन्सच्या टीम पहिल्या मॅचमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहेत. या मॅचमध्ये विजय मिळवण्यासाठी दोन्ही टीमनं योग्य अंतिम 11 (Playing 11) खेळाडू मैदानात उतरवणे आवश्यक आहे. गतविजेत्या मुंबईच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये यंदा काही बदल होण्याची शक्यता आहे. तर विराटची आरसीबी देखील नव्या खेळाडूंना संधी देईल असं मानलं जात आहे. मुंबईचा अनुभव विरुद्ध आरसीबीचा युवा जोश यांच्यातील ही लढत असेल. मुंबईचा मॅच विनर पहिल्या मॅचमध्ये नाही! मुंबई इंडियन्सचा मॅच विनर क्विंटन डी कॉक पहिली मॅच खेळण्याची शक्यता कमी आहे. डी कॉक काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेतून चेन्नईत दाखल झाला आहे. त्याला पहिल्या मॅचमध्ये आराम मिळण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीमध्ये मुंबईची ओपनिंग रोहित शर्मा आणि इशान किशन करण्याची शक्यता आहे. मुंबईची मिडल ऑर्डर मजबूत आहे. त्यांच्याकडं सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड हे जबरदस्त बॅट्समन आहेत. तर ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहवर बॉलिंगची भिस्त असेल. मुंबई इंडियन्सची संभाव्य Playing XI : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, जेम्स निशम, कृणाल पांड्या, पियूष चावला, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह आरसीबी कुणाला देणार संधी? आरसीबीची बॅटींग नेहमीप्रमाणे यंदाही मजबूत आहेत. या सिझनमध्ये त्यांनी कायले जेमिन्सन आणि डॅन ख्रिस्टीन हे ऑल राऊंडर घेत टीम संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या टीममध्ये मोहम्मद अझहरुद्दीन हा युवा विकेट किपर देखील आहे. आरसीबीची बॅटींग मजबूत असली तरी त्यांची टीम बॉलिंगमध्ये चहल आणि सुंदरवर अवलंबून आहे. (  IPL 2021 : मुंबई मजबूत का बँगलोर? पाहा 13 वर्षांमधलं रेकॉर्ड  ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची Playing XI : विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, एबी डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद अझहरुद्दीन, डॅन ख्रिस्टीन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमिसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात