IPL 2021 : मुंबई मजबूत का बँगलोर? पाहा 13 वर्षांमधलं रेकॉर्ड

IPL 2021 : मुंबई मजबूत का बँगलोर? पाहा 13 वर्षांमधलं रेकॉर्ड

जगातल्या सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलला (IPL 2021) शुक्रवार 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे.

  • Share this:

चेन्नई, 8 एप्रिल : जगातल्या सगळ्यात मोठी टी-20 लीग असलेल्या आयपीएलला (IPL 2021) शुक्रवार 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये रोहित शर्माची (Rohit Sharma) मुंबई आणि विराट कोहलीची (Virat Kohli) बँगलोर यांच्यात पहिली लढत होईल. मुंबई इंडियन्स आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम आहे. मागच्या दोन्ही मोसमात मुंबईने आयपीएल ट्रॉफी पटकावली, त्यामुळे विजयाची हॅट्रिक साधण्याचं मुंबईचं लक्ष्य असेल.

दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर आपल्या टीमचं नाव कोरता आलेलं नाही. मुंबई आणि बँगलोर यांच्यामध्ये 2008 पासून 29 मॅच झाल्या, यापैकी मुंबईने 19 मॅच जिंकल्या, तर बँगलोरला फक्त 10 मॅच जिंकता आल्या.

आयपीएलमध्ये दोन्ही टीममध्ये 27 तर चॅम्पियन्स लीगमध्ये 2 सामने झाले. चॅम्पियन्स लीगचे दोन्ही सामने मुंबईने जिंकले, तर आयपीएलच्या 27 पैकी 17 सामन्यांमध्ये मुंबईचा तर उरलेल्या 10 सामन्यांमध्ये बँगलोरचा विजय झाला. चिदंबर स्टेडियममध्ये या दोन्ही टीमची ही तिसरी मॅच असेल, याआधी झालेल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबई आणि बँगलोरने एक-एक विजय मिळवला होता.

युएईमध्ये झालेल्या मागच्या मोसमात मुंबईचा एका सामन्यात विजय झाला, तर दुसरी मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली आणि बँगलोरने विजय मिळवला. या दोन्ही टीममध्ये पहिला सामना 2008 साली झाला होता, तेव्हा बँगलोरची टीम 5 विकेटने जिंकली होती. तर त्याच वर्षी झालेल्या दुसऱ्या सामन्यात मुंबईने बँगलोरचा 9 विकेटने पराभव केला होता. चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही टीममध्ये 2011 साली मॅच झाल्या होत्या, तेव्हा एका सामन्यात मुंबईचा 31 रनने विजय झाला आणि दुसरा सामना बँगलोरने 43 रनने जिंकला.

बँगलोरची संपूर्ण टीम

विराट कोहली, एबी डिविलियर्स, युझवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, एडम झम्पा, शाहबाज अहमद, फिन एलेन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, काइल जेमीसन, डॅनियल ख्रिश्चन

मुंबईची संपूर्ण टीम

रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, एडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाइल, पियुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंडुलकर

Published by: Shreyas
First published: April 8, 2021, 6:34 PM IST

ताज्या बातम्या