IPL 2021: रोहित शर्माचा जबरदस्त सिक्स पाहून रितिका-नताशासह मुंबईची गर्ल्स गँग थक्क

IPL 2021: रोहित शर्माचा जबरदस्त सिक्स पाहून रितिका-नताशासह मुंबईची गर्ल्स गँग थक्क

रोहित शर्मानं (Rohit Sharma) एक जबरदस्त सिक्स मारला. तो सिक्स त्याची पत्नी रितिका, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविच यांच्यासह मुंबईची संपूर्ण गर्ल्स गँग पाहातच राहिली.

  • Share this:

चेन्नई, 21 एप्रिल: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये खेळलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मंगळवारी पराभव झाला. दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) त्यांचा 6 विकेट्सनं पराभव केला. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या मुंबईनं दिल्ली कॅपिल्ससमोर 138 रनचं टार्गेट दिलं होतं. दिल्लीनं ते टार्गेट 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईकडून कॅप्टन रोहित शर्मानं सर्वात जास्त रन्स केले. रोहितनं 30 बॉलमध्ये 3 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं 44 रन केले.

या मॅचच्या दरम्यान रोहित शर्मानं एक जबरदस्त सिक्स मारला. तो सिक्स त्याची पत्नी रितिका, हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टानकोविच यांच्यासह मुंबईची संपूर्ण गर्ल्स गँग पाहातच राहिली. मुंबई इंडियन्सच्या इनिंगमध्ये 5 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला कागिसो रबाडानं टाकलेल्या 5 व्या बॉलवर रोहितनं 95 मीटर लांब सिक्स मारला. मागच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या रबाडाला रोहितनं मारलेला तो सिक्स सध्या व्हायरल होत आहे. तो सिक्स पाहून सर्व जण थक्क झाले. या मॅचमध्ये रोहितनं आर. अश्विनच्या एका बाहेर जाणाऱ्या बॉलवर एका हातानेच बाऊंड्री लाईनच्या बाहेर पोहचवलं.

रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर  रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला आहे. रोहितला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. रोहितवर स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) साठी हा दंड भरावा लागणार आहे. मुंबईच्या टीमने निश्चित वेळेमध्ये ओव्हर्स न टाकल्याने कर्णधाराला हा दंड भरावा लागणार आहे. आयपीएलच्या या सीझनमध्ये मुंबईने अशाप्रकारे पहिल्यांदा चूक केली आहे आणि त्यामुळे त्यांना आयपीएल कोड ऑफ कंडक्ट अंतर्गत दंड भरावा लागणार आहे.

IPL 2021: अमित मिश्राने रचला नवा रेकॉर्ड, तर 'या' विक्रमापासून केवळ 7 विकेट्स दूर

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास 12 लाख रुपयांचा दंड आणि पुढील दोन सामन्यांमध्ये पुन्हा तीच चूक केली तर कर्णधाराला कडक शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. पहिल्यांदा ही चूक झाली तर कॅप्टनला 12 लाखांचा दंड, दुसऱ्यांदा चूक झाली तर कॅप्टनला 24 लाखांचा दंड तिसऱ्या चुकीसाठी कॅप्टनवर एका मॅचची बंदी असा नियम आहे. तर दुसऱ्यांदा या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 25 टक्के रक्कम (यापैकी जे कमी असेल ते) दंड, तिसऱ्या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड म्हणून द्यावी लागेल.

Published by: News18 Desk
First published: April 21, 2021, 3:48 PM IST

ताज्या बातम्या