मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: मुंबई इंडियन्समधून 'या' दिग्गजाचा पत्ता कट, रोहित शर्मा देणार नाही संधी!

IPL 2021: मुंबई इंडियन्समधून 'या' दिग्गजाचा पत्ता कट, रोहित शर्मा देणार नाही संधी!

आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) आता शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. आयपीएल प्ले ऑफ मधील (IPL Playoff) 4 पैकी 3 टीम निश्चित झाल्या आहेत. शेवटच्या जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन टीममध्ये चुरस आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 7 ऑक्टोबर :  आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) आता शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. आयपीएल प्ले ऑफ मधील (IPL Playoff) 4 पैकी 3 टीम निश्चित झाल्या आहेत. शेवटच्या जागेसाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि मुंबई इंडियन्स (MI) या दोन टीममध्ये चुरस आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला यंदा त्यांच्या लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. मात्र राजस्थान रॉयल्स विरुद्ध (RR) मिळवलेल्या मोठ्या विजयानं त्यांच्या 'प्ले ऑफ' च्या आशा वाढल्या आहेत. 'या' खेळाडूचा पत्ता कट मुंबई इंडियन्सनं राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये इशान किशनचा (Ishan Kishan) टीममध्ये समावेश केला. क्विंटन डी कॉकच्या (Quintion de Kock) जागी त्याला संधी देण्यात आली होती.  इशाननं आक्रमक अर्धशतक झळकावत त्याची टीममधील निवड सार्थ ठरवली. इशानच्या या खेळीमुळे त्याची टीममधील ओपनर म्हणून  जागा पक्की झाली आहे, असं मत मुंबईचा फास्ट बॉलर नॅथन  कुल्टर नाईल (Nathan Coulter Nile) याने व्यक्त केले आहे. राजस्थानवरील विजयात 14 रन देऊन 4 विकेट्स घेणाऱ्या कुल्टर नाईलचाही मोठा वाटा होता. कुल्टर नाईलनं सांगितलं की, 'माझ्या मते, इशानचं पुनरागमन ही चांगली गोष्ट होती. इतक्या अवघड विकेटवर चांगले प्रदर्शन करणे हे आमच्या बेंच स्ट्रेंथच्या शक्तीचं उदाहरण आहे. त्यामुळे त्यानं रन काढलेले पाहून मला विशेष आनंद झाला. आता तो फॉर्मात परतला आहे. त्यामुळे यापुढील काळात देखील हाच फॉर्म कायम ठेवू शकतो. IPL 2021 Playoff: मुंबई इंडियन्सच्या आशा वाढल्या, 'या' पद्धतीनं मिळेल टॉप 4 मध्ये प्रवेश इशाननं ओपनिंगला बॅटींग करणे चांगले आहे. त्याला शॉट्स खेळायला आवडतात. क्विंटन डी कॉक बाहेर असल्यानं तो ओपनिंगला बॅटींग करु शकतो. त्यामुळे बहुधा त्यानं ओपनर म्हणून जागा पक्की केली आहे.' असे कुल्टर नाईलने सांगितले. MI vs RR: ...अन् पांड्याने मैदानातच घेतला इशानचा किस; Video तुफान व्हायरल इशान किशननं राजस्थान विरुद्ध फक्त 25 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. इशाननं या खेळीत 5 फोर आणि 3 सिक्स लगावले. इशानची या आयपीएलमध्ये कामगिरी निराशाजनक झाली होती. त्यामुळे त्याला काही मॅचमध्ये वगळण्यात आले होते. राजस्थान विरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला. तसंच त्याला ओपनिंगला उतरवण्यात आले. रोहित शर्माची ही चाल अचूक ठरली.
First published:

Tags: IPL 2021, Mumbai Indians, Quinton de kock

पुढील बातम्या