मुंबई, 7 एप्रिल: पाच वेळा आयपीएल (IPL) स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आयपीएलमधील एक मजबूत टीम मानली जाते. यंदा कोरोनामुळे सर्व टीम्सना बायो-बबलचं पालन करणं बंधनकारक आहे. त्यामुळे या बायो-बबलमध्ये खेळाडू कसं राहतात याची उत्सुकता क्रिकेट फॅन्सना आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबई इंडियन्सचा आक्रमक बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने हॉटेलमधील रुमची माहिती दिली आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला सूर्यकुमार सायकलवर हॉटेलात दाखल होतो. सूर्या हॉटेलातील दोन मोठ्या रुमध्ये जोतो तिथं खेळाडू आणि स्टाफ मनोरंजनासाठी येतात. तिथं या सर्वांसाठी टेबल टेनिस, लुडो, बुद्धीबध यासारख्या खेळांची सुविधा आहे. त्याचबरोबर दोन मोठे टीव्ही सेट देखील लावले आहेत. इशान किशन हा बऱ्याचदा टीव्ही समोर असतो, अशी माहिती सुर्या यावेळी देतो.
झहीर खान आणि रॉबिन सिंह या मुंबईच्या प्रशिक्षकांचा टेबल टेनिसवर ताबा असतो अशी माहिती आपल्याला मिळते. रुममधील एका खोलीत मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू आणि त्यांच्या जवळच्या मंडळींचे फोटो लावण्यात आले आहेत. नुकतंच लग्न झालेल्या जसप्रीत बुमराह आणि जयंत यादव यांच्या लग्नाचा फोटोही या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या रुममध्ये सर्व प्रकारची वाद्यं उपलब्ध आहेत.
View this post on Instagram
( 'मला एक दिवस तस्लीमा भेटल्या तर...' रागवलेल्या मोईन अलीच्या वडिलांनी दिलं उत्तर )
दुसऱ्या रुममध्ये ऑनलाईन गेमचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. हार्दिक आणि कृणाल हे पांड्या बंधू कार रेसिंगचे फॅन्स आहेत. त्यांच्यामध्ये अनेकदा जबरदस्त मॅच होते. ही मॅच पाहताा मजा येते, असं सूर्यकुमार सांगतो. तर जसप्रीत बुमराह हा टार्ट बोर्ड (Dart Board) चॅम्पियन असल्याची माहिती त्यानं यावेळी दिली.