चेन्नई, 24 एप्रिल : आयपीएल स्पर्धेचं सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) शुक्रवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध 9 विकेट्सनं दणदणीत पराभव झाला. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) 63 रनची खेळी केली. मात्र त्याची ही खेळी मुंबईचा पराभव टाळू शकली नाहीत. मुंबईचा या स्पर्धेतील हा तिसरा पराभव आहे. रोहित शर्मानं या मॅचनंतर बोलताना मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. " मलाअजूनही वाटतं हे पिच बॅटींगसाठी वाईट नव्हतं. पंजाबच्या बॅट्समननी कशा पद्धतीनं रन काढले हे तुम्ही पाहिलं. आमच्या बॅटींगमध्ये काही गोष्टी कमी पडल्या. या पिचवर 150-160 स्कोअर केला असता तर तुम्ही ही मॅच लढू शकला असता. त्यांच्या बॉलर्सनी ‘पॉवर प्ले’ मध्ये चांगली कामगिरी केली. " असं रोहित शर्मानं सांगितलं. रोहित पुढे म्हणाला की, " इशान किशन बॉल चांगल्या पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न करत होता, पण तो यशस्वी झाला नाही. माझ्या बाबतीत देखील हेच घडलं. आम्ही मागच्या मॅचमध्ये ‘पॉवर प्ले’ मध्ये चांगला खेळ केला होता. मात्र आज आम्ही यशस्वी ठरलो नाही. आम्हाला ज्या पद्धतीनं खेळायचं होतं, तसं खेळता आलं नाही. मिडल ऑर्डरमध्ये चांगला खेळ करेल अशा बॅट्समनची आम्हाला गरज आहे. सूर्यकुमार तसाच खेळाडू आहे. मात्र तुम्ही या पद्धतीच्या पिचवर खेळता तेव्हा तुम्हाला तसं स्वत:ला तयार करणं आवश्यक असतं,’’ असं रोहितनं स्पष्ट केलं. ‘जब शिकार करते हैं…’ पंजाबच्या विजयानंतर वासिम जाफरची पहिली प्रतिक्रिया आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधला मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरूच आहे. मुंबईने विजयासाठी ठेवलेलं 132 रनचं आव्हान पंजाब किंग्सनं फक्त एका विकेट्सच्या मोबदल्यात 17.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पंजाबकडून केएल राहुलनं (KL Rahul) सर्वात जास्त नाबाद 60 रन काढले. त्यालाच ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







