• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: 'जब शिकार करते हैं...' पंजाबच्या विजयानंतर वासिम जाफरची पहिली प्रतिक्रिया

IPL 2021: 'जब शिकार करते हैं...' पंजाबच्या विजयानंतर वासिम जाफरची पहिली प्रतिक्रिया

सलग तीन पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये तळाशी असलेल्या पंजाब किंग्जनं (PBKS) स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. पंजाबच्या विजयानंतर त्यांचा बॅटींग कोच वासिम जाफर (Wasim Jaffer) याने हटके प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  चेन्नई, 24 एप्रिल : सलग तीन पराभवानंतर पॉईंट टेबलमध्ये तळाशी असलेल्या पंजाब किंग्जनं (PBKS) स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. पंजाबनं आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा (MI)  9 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईत शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या बॅट्समननं निराशा केली. त्यांना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 131 रनच करता आले. पंजाबनं 132 रनचं आव्हान 17.4 ओव्हर्समध्येच पार केलं. पंजाबच्या या मोठ्या विजयानंतर त्यांचा बॅटींग कोच वासिम जाफर (Wasim Jaffer) चांगलाच आनंदी झाला आहे. मुंबई विरुद्ध मिळालेल्या विजयाचं महत्त्व त्याला माहिती आहे. हटके ट्विट्स करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जाफरनं पंजाबच्या विजयानंतरही एक हटके ट्विट केलं आहे. जाफरनं सिंहाचा फोटो वारला असून त्यावर 'जब शिकार करते हैं, बडा करते हैं ' असं कॅप्शन दिलं आहे. पंजाबकडून केएल राहुलने नाबाद 60 आणि क्रिस गेलने नाबाद 43 रन केले, तर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 25 रनवर आऊट झाला. मुंबईकडून राहुल चहरला (Rahul Chahar) एकमेव विकेट मिळाली. पंजाबचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय आहे. त्यांनी यापूर्वी राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं होतं. IPL 2021: रोहित शर्माची एक चूक ठरली मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली. मुंबईकडून  रोहित शर्माने सर्वाधिक 63 रन केले. तर,  सूर्यकुमार यादवने 27 बॉलमध्ये 33 रन केले. सूर्यकुमार यादवची विकेट गेल्यानंतर मुंबईच्या बॅटिंगचा संघर्ष सुरू झाला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 1 रनवर आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) 3 रनवर आऊट झाला. पंजाबकडून मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर दीपक हुडा आणि अर्शदीप सिंगला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
  Published by:News18 Desk
  First published: