• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021, Points Table: सलग 2 पराभवामुळे रोहितचं टेन्शन वाढलं, मुंबईचं स्वप्न धोक्यात

IPL 2021, Points Table: सलग 2 पराभवामुळे रोहितचं टेन्शन वाढलं, मुंबईचं स्वप्न धोक्यात

आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं जबरदस्त खेळ करत मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सनं पराभव (KKR beat MI) केला. कोलकाताच्या या विजयामुळे आयपीएल स्पर्धेचं समीकरण बदललं आहे.

 • Share this:
  अबुधाबी,  24 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं जबरदस्त खेळ करत मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सनं पराभव (KKR beat MI) केला.  कोलकातानं फक्त 15.1 ओव्हरमध्ये 156 रनचं टार्गेट पूर्ण केलं. कोलकाताच्या विजयात त्यांच्या तरुण खेळाडूंचं मोठं योगदान होतं. राहुल त्रिपाठीनं 42 बॉलमध्ये नाबाद 74 रन काढले. तर व्यंकटेश अय्यरनं 30 बॉलमध्ये 53 रनचं योगदान दिलं. या दोघांच्या आक्रमक बॅटींगसमोर बुमराह, बोल्ट, मिल्ने, आणि राहुल चहर या मुंबईच्या दिग्गज बॉलरनं गुडघे टेकले. कोलकाताच्या या विजयामुळे पॉईंट टेबलचं समीकरण बदललं आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी चेन्नईनं मुंबईचा पराभव केला होता. या दोन पराभवामुळे मुंबईची टीम टॉप 4 मधून बाहेर पडली आहे. मुंबईनं 2019 आणि 2020 या सलग दोन वर्षांमध्ये आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. यंदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणारी पहिली टीम होण्याची संधी मुंबईला आहे. पण या खराब कामगिरीमुळे त्यांचं हे स्वप्न धोक्यात आलं आहे. कोलकातानं (Kolkata Knight Riders) मुंबईवरील मोठ्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2021 Points Table) चौथ्या क्रमांकावर धडक मारली आहे. तर मुंबईची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दोन मोठ्या विजयानं कोलकाताचा रनरेट देखील चांगला झाला असून आता ही टीम 'प्ले ऑफ' ची प्रबळ दावेदार बनली आहे. IPL 2021, MI vs KKR : अय्यर-त्रिपाठीने धू-धू धुतलं, मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स 9 पैकी 7 विजयासह टॉपवर आहे. दुसऱ्या नंबरवर चेन्नई सुपर किंग्स आहे. त्यांनी 8 पैकी 6 मॅच जिंकल्या आहेत. बंगळुरूची टीम तिसऱ्या नंबरवर आहे. विराटच्या टीमनं 8 पैकी 5  मॅच जिंकल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स 9 मॅचमध्ये 4 विजयासह चौथ्या क्रमांकावर पोहचली आहे. तर राजस्थान रॉयल्स 8 पैकी 4 मॅच जिंकून चौथ्या क्रमांकावर आहे. POINTS TABLE: कोलकाताशी झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची टीम 9 मॅचमध्ये 4 विजय आणि 5 पराभवानंतर सहाव्या क्रमांकावर घसरली आहे. आता मुंबईला 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित 5 पैकी 4 मॅच जिंकणे आवश्यक आहे. याचाच अर्थ आणखी एक चूक मुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ' मधून बाहेर काढू शकते. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये पंजाब किंग्ज सातव्या तर सनरायझर्स हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: