Home /News /sport /

IPL 2021, MI vs KKR : अय्यर-त्रिपाठीने धू-धू धुतलं, मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच

IPL 2021, MI vs KKR : अय्यर-त्रिपाठीने धू-धू धुतलं, मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (MI vs KKR) मुंबईचा 7 विकेटने पराभव केला आहे.

    अबुधाबी, 23 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (MI vs KKR) मुंबईचा 7 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने दिलेल्या 156 रनच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने 15.1 ओव्हरमध्येच पूर्ण केला. राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 42 बॉलमध्ये नाबाद 74 रन तर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) 30 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनेच तिन्ही विकेट घेतल्या. कोलकात्याविरुद्धच्या या सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही मुंबई इंडियन्सची (MI vs KKR) बॅटिंग गडगडली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) यांनी मुंबईला 9.2 ओव्हरमध्ये 78 रनची सुरुवात करून दिली, तरी मुंबईला 20 ओव्हरमध्ये 155 रनपर्यंतच मजल मारता आली. क्विंटन डिकॉकने 42 बॉलमध्ये 55 रन केले, तर रोहित 30 बॉलमध्ये 33 रन करून आऊट झाला. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन पुन्हा एकदा अपयशी ठरले. पोलार्डने 15 बॉलमध्ये 21 रनची खेळी केली. कोलकात्याकडून लॉकी फर्ग्युसन आणि प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर सुनिल नारायणने एक विकेट घेतली. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात खेळला. चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता, पण हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या मॅचमध्येही खेळत नाहीये. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या राऊंडच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चेन्नई सुपर किंग्सने 20 रनने पराभव केला होता. चेन्नईची अवस्था 24/4 अशी केल्यानंतरही मुंबईला पराभवाचा धक्का बसला होता, तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सनी आरसीबीचा 9 विकेटने पराभव केला होता. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने विराटच्या आरसीबीला मोठा स्कोअर करून दिला नाही. पॉईंट्स टेबलची स्थिती आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) मोठे बदल झाले आहेत. चौथ्या क्रमांकावर असणारी मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे, तर कोलकाता चौथ्या क्रमांकावर आली आहे. कोलकाता आणि मुंबईने प्रत्येकी 9 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे, पण चांगल्या नेट रनरेटमुळे कोलकाता चौथ्या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे.

    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, KKR, Mumbai Indians

    पुढील बातम्या