Home /News /sport /

IPL 2021: ऋतुराजनं शतकापूर्वीच सुरू केले सेलिब्रेशन, सर्वांना झाली नीरज चोप्राची आठवण! पाहा VIDEO

IPL 2021: ऋतुराजनं शतकापूर्वीच सुरू केले सेलिब्रेशन, सर्वांना झाली नीरज चोप्राची आठवण! पाहा VIDEO

आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (RR vs CSK) 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईच्या या मोठ्या पराभवानंतरही मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या लढतीमध्ये राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (RR vs CSK) 7 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईच्या या मोठ्या पराभवानंतरही मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. ऋतुराजनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीमधील पहिलं शतक झळकावलं. ओपनिंगला आलेल्या ऋतुराजनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत हे शतक पूर्ण केलं. ऋतुराजनं राजस्थानच्या बॉलर्सची जोरदार धुलाई करत 60 बॉलमध्ये नाबाद 101 रनची खेळी केली. या खेळीत 9 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. ऋतुराजला शेवटच्या बॉलवर शतक पूर्ण करण्यासाठी 5 रनची आवश्यकता होती. त्यावेळी त्यानं जोरदार शॉट लगावला. त्यानंतर बॉलकडं न पाहताच त्यानं सेंच्युरीचे सेलिब्रेशन सुरु केले. ज्या ताकदीनं ऋतुराजनं हा शॉट मारला होता, ते पाहात तो सिक्सच जाणार याची ऋतुराजला खात्री होती. ऋतुराजचं हे सेलिब्रेशन पाहून अनेकांना भारताचा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची (Neeraj Chopra) आठवण झाली. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नीरजनं भाला फेक करताच सेलिब्रेशन केले होते. त्यानं भालाफेक स्पर्धेत भारतासाठी ऐतिहासिक गोल्ड मेडल जिंकले. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज गायकवाडने 500 रनचा टप्पा ओलांडला आहे. तसंच तो या मोसमात सर्वाधिक रन करणारा खेळाडूही बनला आहे. 12 मॅचमध्ये ऋतुराजने 50.80 ची सरासरी आणि 140.33 च्या स्ट्राईक रेटने 508 रन केले आहेत. यात 3 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. 11 वर्षांच्या अनुभवी बॉलरवर भारी पडला 19 वर्षांचा यशस्वी! नव्या विक्रमाची केली नोंद ऋतुराजच्या या शतकानंतरही चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पराभव झाला.  चेन्नईने दिलेलं 190 रनचं आव्हान राजस्थानने 7 विकेट आणि 15 बॉल राखून पूर्ण केलं. चेन्नईने ठेवलेल्या 190 रनच्या आव्हानचा पाठलाग करताना राजस्थानचे ओपनर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि एव्हिन लुईस (Evin Lewis) यांनी धमाक्यात सुरुवात केली. जयस्वाल आणि एव्हिन लुईस यांच्या जोडीने राजस्थानला 5 ओव्हरमध्ये 77 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. 21 बॉलमध्ये 50 रन करून जयस्वाल आऊट झाला. त्याने या खेळीमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स मारले. शिवम दुबे (Shivam Dubey) याने 42 बॉलमध्ये नाबाद 64 रन केले, यात 4 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021

    पुढील बातम्या