मुंबई, 4 ऑगस्ट : बॉलिवूडचा बादशहा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मालक शाहरुख खानचं (Shah Rukh Khan) मोठं टेन्शन दूर झालं आहे. आयपीएलच्या 14 व्या सिझनचा उत्तरार्ध पुढील महिन्यात सुरु होत आहे. यूएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी शाहरुख खानची डोकेदुखी वाढली होती. आता इंग्लंडमधून आलेल्या बातमीनं त्याची डोकेदुखी कमी झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन इयन मॉर्गननं (Eoin Morgan) उर्वरित स्पर्धा खेळण्याचं जाहीर केलं आहे. इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पुढील महिन्यात मर्यादीत ओव्हर्सची मालिका होणार होती. दोन्ही बोर्डाच्या सहमतीनंतर ही मालिका आता पुढील वर्षी मार्च महिन्यात होणार आहे. बांगलादेश विरुद्धची मालिका लांबणीवर गेल्यानं आयपीएल स्पर्धेत खेळायचं की नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) खेळाडूंना दिले आहे. त्यानंतर मॉर्गननं आपण उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याची घोषणा केली आहे.
मागील आयपीएल स्पर्धा सुरु असताना मॉर्गनची केकेआरचा कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तो उर्वरित स्पर्धेत खेळला नसता तर कॅप्टन कुणाला करायचा हा प्रश्न शाहरुख खान आणि टीम मॅनेजमेंटपुढे होता. ही समस्या आता दूर झाली आहे. आयपीएलनंतर लगेच यूएईमध्येच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे आयपीएलमधील अनुभवाचा टी20 वर्ल्ड कपमध्ये उपयोग होईल अशी आशा मॉर्गननं व्यक्त केली आहे.
IND vs ENG : अश्विनला टीममधून वगळण्याचे जोरदार पडसाद, सोशल मीडियावर विराट टार्गेट
बांगलादेशचा दौरा रद्द झाल्यानं आता आगामी टी20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडची टीम केवळ पाकिस्तान विरुद्ध दोन टी20 सामने खेळणार आहे. 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी हे सामने होणार आहेत. हे सामने नियोजित वेळापत्रकानुसार होतील अशी आशा दोन्ही देशांच्या बोर्डाने व्यक्त केली आहे. मात्र इंग्लंडच्या ज्या खेळाडूंच्या आयपीएल टीम 'प्ले ऑफ' मध्ये जाणार आहेत ते खेळाडू पाकिस्तान विरुद्ध खेळणार का? हा प्रश्न कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2021, KKR, Shah Rukh Khan