नॉटिंघम, 4 ऑगस्ट : नॉटिंघम टेस्टमध्ये टीम इंडियानं प्लेईंग 11 ची (India vs England, 1st Test) घोषणा करताच सर्वांना मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट बॉलर आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) टीममधून वगळल्याचं जाहीर केलं. कोहलीनं अश्विनच्या जागी जडेजाला स्पिनर म्हणून पसंती दिली. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) अनुभवी इशांत शर्माच्या जागी निवड केली. विराटच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर जोरदार पडसाद उमटले आहेत.
माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनं ट्विट करत अश्विनला टीममध्ये न घेण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे अश्विननं या टेस्टपूर्वीच आपण फॉर्ममध्ये असल्याचं दाखवलं होतं. त्यानं सरेकडून खेळताना फक्त 29 रन देत 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर अश्विन प्रॅक्टीस मॅचमध्ये खेळला नव्हता. आता त्याला पहिल्या टेस्टमध्येही संधी देण्यात आलेली नाही.
अश्विनला का वगळलं?
टीम इंडियामध्ये संतुलन बनवण्यासाठी आर. अश्विनला टीममधून वगळण्यात आले असा युक्तीवाद दिला जात आहे. नॉटिंगहममधील पिचवरील हिरवळ पाहून 2 ऑल राऊंडर्सचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. रविंद्र जडेजा स्पिन बॉलिंग ऑल राऊंडर आहे. तर शार्दूल ठाकूर स्विंग बॉलिंगसह लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅट्समन आहे. विराटनं मंगळवारीच शार्दूलला टीममध्ये खेळवण्याचे संकेत दिले होते. मात्र टीमच्या या निर्णयावर क्रिकेट फॅन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.
अश्विनचे इंग्लंडमधील प्रदर्शन
अश्विननं इंग्लंडमध्ये आजवर 6 टेस्टमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला इंग्लंडमध्ये एकदाही इनिंगमध्ये पाच विकेट्स घेण्यात यश आलेलं नाही. दुसरिकडं जडेजानं 6 टेस्टमध्ये 16 विकेट्सच घेतल्या आहेत. मात्र टीम मॅनेजनेंटनं जडेजाच्या बॅटींगवर विश्वास दाखवत त्याला संधी दिली आहे.
IND vs ENG : नॉटिंघम टेस्टमध्ये मोठा ड्रामा, आधी नॉट आऊट नंतर OUT
टीम इंडियाची Playing 11
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Social media, Virat kohli