मुंबई, 13 ऑक्टोबर: कोलकाता नाईट रायडर्सचा ऑल राऊंडर (KKR) सुनील नारायण (Sunil Narine) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये केकेआरला एकहाती विजय मिळवून दिला होता. त्यानं आरसीबी विरुद्ध 4 विकेट्स घेतल्या. तसंच चांगली बॅटींगही केली. आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या अनुभवी सुनील नारायणचा टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) वेस्ट इंडिजच्या टीममध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीवर वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) उत्तर दिलं आहे.
पोलार्डनं 'क्रिकइन्फो'शी बोलताना सांगितलं की, 'मी त्याला टीममध्ये न घेण्याची कारणं सांगितली तरी त्याचा विपर्यास केला जाईल. त्यापेक्षा आमच्या टीममधील 15 खेळाडूंर आपण जास्त लक्ष देऊया. या खेळाडूंना घेऊन आम्ही विजेतेपद कसं राखू शकतो यावर आम्हाला काम करावं लागेल. नारयणच्या विषयावर यापूर्वी बरंच काही बोललं गेलं आहे. मी त्याबाबत अधिक बोलू इच्छित नाही.
माझ्या मते त्याला टीममध्ये का घेतलं नाही, त्याची कारणं तेव्हाच सांगितली गेली आहेत. वैयक्तिक पातळीवर तो माझा चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र क्रिकेट खेळून मोठे झालो आहोत. तो एक जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे.' असं पोलार्ड यावेळी म्हणाला.
या आयपीएलमध्ये दुखापतीमुळे 26 सप्टेंबरनंतर एकही मॅच न खेळलेला ऑल राऊंडर आंद्रे रसेल हा वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाचा सदस्य असल्याचं पोलार्डनं सांगितलं. ' आम्हाला त्याला पाहण्याची संधी मिळालेली नाही. तो काय करतोय याचा रिपोर्ट मिळाला आहे. त्यानं काय करावं आणि काय नाही, याबाबत मी काही बोलू शकत नाही. पण, तो आमच्या टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. तो 100 टक्के फिट असावा अशी आमची इच्छा आहे. पण, आम्हाला समोर जशी परिस्थिती असेल तसं खेळावं लागेल,' असं पोलार्डनं स्पष्ट केलं.
IPL 2021 गाजवणारा आणखी एक खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! BCCI चा आदेश
टी20 वर्ल्ड कपसाठी वेस्टइंडीजची टीम: कायरन पोलार्ड (कप्तान), निकोलस पूरन, फॅबियन एलन, ड्वेन ब्रावो, रोस्टन चेज, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, शिमरोन हेटमायर, एविन लुईस, ओबेड मॅकॉय, रवि रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स ओशेन थॉमस आणि हेडन वॉल्श ज्यूनिअर
रिझर्व्ह खेळाडू : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर, अकील होसनेन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.