मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: KKR ची टीम संकटात, जुन्या Tweets मुळे दिग्गज अडचणीत

IPL 2021: KKR ची टीम संकटात, जुन्या Tweets मुळे दिग्गज अडचणीत

सोशल मीडियावरील जुन्या प्रतिक्रियांमुळे इंग्लंड (England) क्रिकेट टीममध्ये सुरु असलेल्या वादळामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीम देखील अडचणीत आली आहे.

सोशल मीडियावरील जुन्या प्रतिक्रियांमुळे इंग्लंड (England) क्रिकेट टीममध्ये सुरु असलेल्या वादळामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीम देखील अडचणीत आली आहे.

सोशल मीडियावरील जुन्या प्रतिक्रियांमुळे इंग्लंड (England) क्रिकेट टीममध्ये सुरु असलेल्या वादळामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीम देखील अडचणीत आली आहे.

मुंबई, 10 जून : सोशल मीडियावरील जुन्या प्रतिक्रियांमुळे इंग्लंड (England) क्रिकेट टीममध्ये सुरु असलेल्या वादळामुळे कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीम देखील अडचणीत आली आहे. कोलकाताचा कॅप्टन इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि हेड कोच ब्रँडन मॅकलम (Brendon McCullum) यांचे जुने ट्विट्स व्हायरल (Tweets Viral) झाले आहेत. या दोघांनी भारतीयांना उद्देशून वर्णद्वेषी प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त केली होती.

इयन मॉर्गन आणि ब्रँडन मॅकलम यांनी भारतीयांच्या इंग्रजीची थट्टा करणारे ट्विट 2018 साली केले होते. या दोघांनी जाणीवपूर्वक सर हा शब्द वापरला होता, तसेच चुकीच्या इंग्रजीमध्ये ट्विट करत भारतीयांची थट्टा केली होती. त्याचे स्क्रीन शॉट्स आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) मॉर्गनची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

भेदभावाला थारा नाही

"या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. या विषयावर कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी योग्य प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र नाईट रायर्डर्सच्या संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नाही." अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसूर (Venky Mysore) यांनी 'क्रिकबझ' शी बोलताना दिली आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनचा (IPL 2021) उत्तररार्ध सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. सध्या केकेआरची टीम पॉईंट टेबलमध्ये  सातव्या क्रमांकावर आहे.

इंग्लंड टीममध्ये वादळ

इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अँडरसन (James Anderson) याचे 11 वर्षांपूर्वीचे एक ट्विट आता व्हायरल (Tweet Viral) झाले असून त्यामुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे.इंग्लंडचा सर्वात यशस्वी फास्ट बॉलर असलेल्या अँडरसननं हे ट्विट फेब्रुवारी 2010 मध्ये केले होते, असे सांगितले जात आहेत. यामध्ये त्याने स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) लेस्बियन व्यक्तीसारखी हेअरकट केली आहे, असे म्हंटले होते. "मी आज ब्रॉडीचा नवा हेअरकट पाहिला. मला याबाबत खात्री नाही, पण तो 15 वर्षांच्या लेस्बियनसारखा वाटत आहे.' असे ट्विट अँडरसनने केले होते.

धोनीच्या टीममधील खेळाडूचा गझनी लुक Viral, फोटो पाहून साक्षी म्हणाली....

रॉबिन्सन प्रकरणानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या जुन्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत, या सर्व पोस्ट्ची चौकशी देखील करणार असल्याची घोषणा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केली आहे.

First published:
top videos

    Tags: England, IPL 2021, KKR, Racism