मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धोनीच्या टीममधील खेळाडूचा गझनी लुक Viral, फोटो पाहून साक्षी म्हणाली....

धोनीच्या टीममधील खेळाडूचा गझनी लुक Viral, फोटो पाहून साक्षी म्हणाली....

लॉकडाऊनमुळे क्रिकेटपटूंच्या सरावावर मर्यादा आल्या आहेत. या काळात फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी क्रिकेटपटू सोशल मीडियाचा (Social Media) वापर करत आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 जून : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचे 20 प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये आहेत. तर, अन्य सर्व खेळाडू सध्या त्यांच्या घरी कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या क्रिकेटच्या सरावावर देखील मर्यादा आल्या आहेत. या वेळेत फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी हे खेळाडू सोशल मीडियाचा वापर करत आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) त्याची हेअरस्टाईल बदलली आहे.

दीपकने त्याचे केस कमी केले असून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दीपकचा हा फोटो क्रिकेट फॅन्समध्ये चांगलाच व्हायरल झालाय. 'नवीन लुक यापैकी कोणता फोटो तुम्हाला आवडला? मी नक्की ठरवू शकत नाही. त्यामुळे दोन्ही फोटो टाकत आहे, असं कॅप्शन दीपकनं दिले आहे. दीपकचा हा फोटो पाहून अनेक फॅन्सना आमिर खानच्या (Aamir Khan) गझनी (Ghajini) सिनेमातील लुकची आठवण झाली आहे.

महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीला देखील दीपकचा हा फोटो आवडला आहे. 'साक्षीने खतरनाक लुक दीपक' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी दीपक चहरनं सीएसकेसाठी चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याची श्रीलंका विरुद्धच्या दौऱ्यावर जाणाऱ्या टीममध्ये निवड निश्चित आहे.  भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 13 जुलै ते 25 जुलै दरम्यान 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे.

टीम इंडिया विरुद्धच्या टेस्टसाठी 17 सदस्यीय इंग्लंड टीमची घोषणा

या दौऱ्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असून अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) कॅप्टन होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Cricket, Csk, Photo viral, Sakshi dhoni