मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: 'पहिल्या टप्प्यात आम्ही घाबरलो होतो,' KKR च्या कोचचा गौप्यस्फोट

IPL 2021: 'पहिल्या टप्प्यात आम्ही घाबरलो होतो,' KKR च्या कोचचा गौप्यस्फोट

आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात (IPL 2021, Phase 1) भारतामधील कोरोना महामारीमुळे आम्ही घाबरलो होतो, अशी कबुली कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) हेड कोच ब्रँडन मॅकलमनं (Brendon McCullum) दिली आहे.

मुंबई, 15 सप्टेंबर : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात (IPL 2021, Phase 1) भारतामधील कोरोना महामारीमुळे आम्ही घाबरलो होतो, अशी कबुली कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) हेड कोच ब्रँडन मॅकलमनं (Brendon McCullum) दिली आहे. केकेआरचा स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि फास्ट बॉलर संदीप वॉरियर या दोघांना आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात केकेआरची कामगिरी चांगली झाली नसून टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या सातव्या क्रमांकावर आहे. पण, 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास मॅकलमनं व्यक्त केला आहे.

मॅकलमनं केकेआरच्या वेबसाईटवर लिहलं आहे की, 'आम्ही दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करु. आम्हाला एकमेकांचे मनोबल वाढवून पुढील चार-पाच आठवड्यात चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या टप्प्यात आम्ही खूप घाबरलो होतो, असं मला वाटतं.'

आयपीएल स्पर्धेचा 14 वा सिझन भारतामध्ये सुरू होता तेव्हा देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती. आयपीएल स्पर्धेलाही याचा फटका बसला. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानं ही स्पर्धा स्थगित करावी लागली. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने यूएईमध्ये होणार आहेत.

आयपीएलपूर्वी आलं MR. 360 चं वादळ, प्रतिस्पर्धी टीमना दिला धोक्याचा इशारा

'माझ्या कोचिंग शैलीबद्दल टीममधील प्रत्येकाला कल्पना आली आहे. तसंच खेळाडूंना माझ्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा  देखील समजल्या आहेत,' असं मॅकलमनं स्पष्ट केलं आहे. केकेआरची पहिली लढत 20 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

First published:
top videos

    Tags: IPL 2021, KKR