मुंबई, 15 सप्टेंबर : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) या दोन बॅट्समनवर भिस्त आहे. यापैकी डीव्हिलियर्स आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. आयपीएल स्पर्धेचा पहिला टप्पा कोरोनामुळे स्थगित झाला होता. त्यानंतर गेल्या चार महिन्यात तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत अनेकांना चिंता होती. आयपीएल विजेता कॅप्टन गौतम गंभीरनं (Gautam Gambhir) ही चिंता बोलून दाखवली होती. या सर्वांची चिंता डीव्हिलियर्सनं दूर केली आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाली त्यावेळी डीव्हिलियर्स चांगल्या फॉर्मात होता. तोच फॉर्म अजूनही कायम असल्याचं त्यानं दाखवून दिलं आहे. बॉलर्सची धुलाई करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टीसची नाही तर फक्त हातामध्ये बॅट घेण्याची गरज आहे. हे क्रिकेट विश्वात ‘मिस्टर 360’ या नावानं प्रसिद्ध असलेल्या डीव्हिलियर्सनं दाखवून दिलं आहे. आरसीबीची टीम सध्या यूएईमध्ये सराव करत आहे. या सरावाचा भाग म्हणून झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये डीव्हिलियर्सनं फक्त 46 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली. या मॅचमध्ये डिव्हिलियर्स त्याच्या जुन्या रंगात दिसला. त्यानं 46 बॉलमध्ये 104 रन काढले. तो सुरुवातीला 19 बॉलमध्ये 19 रन काढून खेळत होता. पण त्यानंतर त्यानं वेग वाढवला. त्यानं या खेळीत 10 सिक्स आणि 7 फोरचा वर्षाव केला. धोनीनंतर जडेजाला व्हायचं आहे CSK चा कॅप्टन! ऑल राऊंडरनं सांगितली ‘मन की बात’ डीव्हिलियर्सशिवाय या प्रॅक्टीस मॅचमध्ये केएस भरतनं 47 बॉलमध्ये 95 रन, अझरुद्दीननं 43 बॉलमध्ये 66 तर देवदत्त पडिक्कलनं 21 बॉलमध्ये 36 रन काढले. देवदत्त पडिक्कलच्या आरसीबी बीनं हर्षल पटेलच्या आरसीबी ए विरुद्धची ही मॅच 7 विकेट्सनं जिंकली. आरसीबीची पहिली लढत 20 सप्टेंबर रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







