IPL 2021: क्रिकेट फॅन्सना भुरळ घालणारी SRH ची 'मिस्ट्री गर्ल' कोण आहे?

IPL 2021: क्रिकेट फॅन्सना भुरळ घालणारी SRH ची 'मिस्ट्री गर्ल' कोण आहे?

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) 10 रननं पराभव झाला. या पराभवानंतरही चेन्नईतील मैदानात हैदराबादला चीयर करणारी 'मिस्ट्री गर्ल' सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल (Viral) झाली आहे.

  • Share this:

चेन्नई, 12 एप्रिल: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) 10 रननं पराभव झाला. या पराभवानंतरही चेन्नईतील मैदानात हैदराबादला चीयर करणारी 'मिस्ट्री गर्ल' (Mystery Girl) सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल (Viral) झाली आहे. ही 'मिस्ट्री गर्ल' कोण आहे आणि तिचं सनराझर्स हैदराबादशी काय कनेक्शन आहे? हे पाहूया

केकेआरची बॅटिंग सुरु असताना राशिद खाननं आंद्रे रसेलला आऊट केलं. त्यावेळी हैदराबादची नारंगी जर्सी घालणारी एक मुलगी तिच्या मित्रांसोबत चियर करत होती. आंद्रे रसेल आऊट झाल्यानंतर कॅमरामननं स्टँडच्या दिशेनं कॅमेरा फिरवला त्यावेळी ही 'मिस्ट्री गर्ल' कॅमेऱ्यात कैद झाली. या मिस्ट्री गर्लचं नाव काव्या मारन (Kaviya Maran) असून ती सनरायझर्स हैदराबादची सीईओ आहे.

काव्या मारन यांना यापूर्वी देखील हैदराबादच्या मॅचमध्ये टीमला चीयर करताना सर्वांनी बघितलं आहे. त्या सनरायझर्स हैदराबादच्या 'मिस्ट्री गर्ल' म्हणून प्रसिद्ध आहेत. काव्या कलानिधी मारन यांची मुलगी आहे. त्या हैदराबाद टीमच्या सीईओ असून सन म्युझिक आणि सन टीव्हीच्या एफएम चॅनलशी देखील निगडित आहेत. काव्या सर्वात पहिल्यांदा 2018 साली आयपीएलमध्ये दिसल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

काव्या अनेकदा आयपीएल ऑक्शनमध्येही दिसल्या आहेत. त्या ऑक्शन टेबलवर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि टीम मॅनेजमेंटमधील अन्य सदस्यांसोबत उपस्थित असतात. त्याचबरोबर त्या सनराझर्स हैदराबादच्या टीमसोबत प्रवास देखील करतात.

'या' खेळाडूमुळे झाला SRH चा पराभव, सेहवागनं ठेवला ठपका

मनिष पांडे (Manish Pandey) आणि जॉनी बेयरस्टोच्या (Jonny Bairstow) अर्धशतकानंतरही सनरायजर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 10 रनने पराभव झाला आहे. कोलकात्याने दिलेलं 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 177-5 पर्यंतच मजल मारता आली.

Published by: News18 Desk
First published: April 12, 2021, 1:41 PM IST

ताज्या बातम्या