ind vs मुंबई, 31 मार्च : भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नानंतर पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. बुमराहनं इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून (India vs England) माघार घेतली होती. आता आयपीएल स्पर्धेसाठी तो मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीममध्ये दाखल झाला आहे. या स्पर्धेसाठी बुमराह जोरदार तयारी करत आहे. जसप्रीत बुमराहनं वर्कआऊटचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. तो व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. बुमराह हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू आहे. युएईमध्ये मागील वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं विजेतेपद पटकावलं होतं. या विजेतेपदामध्ये बुमराहचं योगदान मोलाचं होतं. बुमराहने मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) 27 विकेट्स घेतल्या होत्या. 14 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आयपीएल कारकीर्दीचा एकूण विचार केला, तर बुमराहने 92 मॅचमध्ये 109 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सनं सर्वात जास्त 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध 9 एप्रिल रोजी होणार आहे.
बुमराहच्या या व्हिडीओचं क्रिकेट फॅन्सनी जोरदार स्वागत केलं आहे. ‘बूम-बूम इज बॅक’ या शब्दामध्ये फॅन्सनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. बुमराहचं लग्न गोव्यामध्ये झालं. या लग्नाला कोरोनाच्या कारणामुळे मर्यादीत लोकं उपस्थित होती. भारत-इंग्लंड मालिकेमुळे टीम इंडियाचा कोणताही सदस्य या लग्नाला उपस्थित राहू शकला नाही. ( वाचा : IPL 2021 : नवी जर्सी लॉन्च केल्यानंतर पंजाब किंग्स ट्रोल, कॉपी केल्याचा आरोप ) मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे चारही खेळाडू सोमवारी दाखल झाले आहेत. हे चौघे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचे सदस्य होते. भारतानं रविवारी झालेली तिसरी वन-डे सात रननं जिंकली. या विजयानंतर हे सर्व खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाले.